रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अजूनही स्वप्नच आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असल्यानेच महाआघाडी शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर आला. धर्मप्रसारासाठी टुरिस्ट व्हिसा काढून आलेले बांगलादेशी केंद्र सरकारविरोधी कारवाया करीत आहेत. यावर राज्य शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या साऱ्या प्रश्नांविरोधात शेतकरी व नागरिकांना एकत्र घेऊन भाजप सर्व तहसील कार्यालयांबाहेर धरणे धरणार असल्याची माहिती भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे उपस्थित होते. मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. माजी खासदार भाजप नेते नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल.
हेही वाचा – माजी आमदारांनी आपल्या पत्नीला नंदगडला सोडले आणि..
शेतकऱ्यांची दिशाभूल
पटवर्धन म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, सात-बारा कोरा करू, या वल्गना ठरल्या आहेत. कर्जबोजा उतरलेला नाही व अजून यादी घोषित झालेली नाही. हे एक स्वप्नच ठरणार असे दिसते. ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याने अनेक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनात भाग घ्यायचे ठरविले आहे. महाजनादेश झुगारून तीन भिन्न विचारसरणी फक्त सत्तेसाठी एकत्र आल्या. हे स्थगिती सरकार आहे. कोकणातील बहुतांश विकासकामांना स्थगिती दिल्याने कामे ठप्प झाली आहेत.
हेही वाचा – कुटुंबीय झोपले निर्धास्त ; मात्र सारा संसार झाला खाक, कसा तो वाचा …
बांगलादेशींवर अजून कारवाई नाही
टुरिस्ट व्हिसा काढून आलेले बांगलादेशी मशिदीत राहत असून, धर्मप्रसार व केंद्र सरकारविरोधी वातावरण तयार करीत आहेत. बांगलादेशी देशविरोधी व दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत. या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करून अद्याप राज्य शासनाने पावले उचललेली नाहीत. शासनाच्या पाठबळामुळेच कारवाई झालेली नाही. यामुळेच राज्य शासनाविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

News Story Feeds