-
“शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज”
मुंबई: सुरक्षा, मालवाहतूक, बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट्स, मोबिलिटी, उत्पन्न, मानव संसाधन या मुद्द्यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी नुकतीच सीएसएमटी येथे कामगिरी बैठक घेतली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतील विविध प्रमुख बाबींचा विभागनिहाय कामगिरीच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी कंसल म्हणाले की, नागरिकांची व प्रवाशांची सुरक्षा ही नेहमीच सर्वोत प्रथम असली पाहिजे. शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी आपण आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे. (General Manager of Central Railway reviews quarterly performance)

Also Read: BMC: ‘या’ कारणांमुळे ‘वरळी ते नरिमन’ सागरी किनारी मार्गात अडथळे!
मध्य रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. मध्य रेल्वे सुरळीच सुरू राहावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात. या उपययोजनांची निर्मिती किंवा दुरूस्ती करण्यासाठी काही ठराविक कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार प्लॅनिंग केले जाते. या प्लॅनिंगपैकी तिमाहीमध्ये कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी झाली याचा आढावा व्यवस्थापकांनी घेतला. रस्ते पूल बांधणे, मानव संचलित लेव्हल क्रॉसिंगचे निर्मूलन आणि डायव्हर्शनद्वारे लेव्हल क्रॉसिंग बंद करणे किंवा थेट बंद करणे, यासारख्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना गती द्यावी. भविष्यातील बांधकामांमध्ये अंगभूत नाल्यांचे डिझाइन केलेले असावे, असे त्यांनी सांगितले.
Esakal