चांगले केस हे फक्त हेअर स्टाईल करुन नाही तर केस व्यवस्थित साफ केल्यामुळे दिसतात. तुमच्या केसांची योग्य निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे. केसांना नियमित तेल न लावणे, हेअर स्टाईलिंग साठी वेगवेगळे केमिकल प्रॉक्डक्ट वापरणे, हेअर ड्रायरचा अतिवापर आणि प्रदुषणामुळे केस खूप खराब होत असतात. तुम्ही जर दिवासाआड केस धुवत असाल तर तुमचे केस कमकुवत होऊ शकतात. आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही केस धुतले तरी पुरेसे आहे.

तुमच्या केसांची योग्य निगा कशी घ्याल? –
केसांना तेल लावा
केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे गरजेचे आहे. तेल कोमट गरम करुन कापसाने केसांच्या मुळांना हळुवारपणे मालिश करा. जर तुम्हाला तेल लावायचे नसेल तर तुमच्यासाठी योग्य असे हेअर मास्क तुम्ही घरच्या घरी वापरु शकता. केसांची विभागणी करुन हेअर माक्स लावून मसाज करा. हे मास्क तुम्ही केस पुसूनही साफ करू शकता.

कोरड्या केसांचा हळूवारपणे विंचरून व्यवस्थित गुंता काढा. त्यामुळे केस साफ करताना मदत होते आणि स्पिट एन्ड होत नाही.

केसांना शॅप्पू करण्यापुर्वी कोमट पाण्याने केस ओले करा. त्यामुळे तुमच्या मुळापर्यंत पोषक घटक पोहचण्यासा मत होते

केस स्वच्छ करताना थेट केसांना शॅम्पू लावू नका. तसे केल्यास केस खराब होण्याची शक्यता आहे. थोड्याशा कोमट पाण्यात शॅम्पू मिसळून मग केसांना लावा. शॅम्पूचा अतिवापर टाळा. केसांना शॅम्पू लावून झाल्यावर तुम्ही केसांच्या मुळाजवळ मसाज करू शकता. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

तुमचे केस खूप कोरडे असती किंवा हेअर स्टाईलिंग टुल्स वापल्यामुले खराब झाले असतील तर काळजी करू नका. केस धुवून झाल्यावर केसांना कंडीशनर लावण्यास विसरू नका. केसांना पोषक तत्वे मिळतात. केसाना कंडीशनल लावल्यानंतर 15 मिनिटांना थंड पाण्यांनी केस धूवा.

केस धूवून झाल्यानंतर कोरड्या टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या आणि केसांना काही वेळ टॉवेल गुडांळून केसांमधील जास्तीचे पाणी काढून टाका
Esakal