अंबाझरी हे नागपूर शहरातील एक पर्यटन स्थळ आहे. उशिरा का होईना दरवर्षीप्रमाणे हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. चला तर पाहुयात याच तलावाचे ‘सकाळ’च्या छायाचित्रकाराने टिपलेले काही दृश्य –

अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. या तलावाचे पूर्वीचे नाव ‘बिंबाझरी’ असे होते.
दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव ओव्हरफ्लो होतो. हा क्षण नागपूरकरांसाठी आनंदाचा असतो. यंदा देखील अंबाझरी ओव्हरफ्लो झाला असून पाणी बाहेर पडत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पर्यटकांनी अंबाझरी तलावावर गर्दी केली आहे. येथील पाण्याचा आनंद घेत आहेत.
तलवाच्या बाहेर स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आणि आय लव्ह नागपूर असं देखील लिहिण्यात आलंय. त्यामुळे हा नागपूरकरांसाठी सेल्फी पाईंट ठरतोय. अनेकजण याठिकाणी फोटोसेशन करताना दिसतात.
अंबाझरी तलावाच्या शेजारीच एक गार्डन आहे. त्याला अंबाझरी गार्डन म्हणतात. याठिकाणीही अनेक पर्यटकांची गर्दी असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here