नागपूर : आरोग्यदायी राहायचे तर पोषक आहार गरजेचा आहे. त्यासोबतच अन्न शिजविण्याची पद्धतही महत्त्वाची ठरते. शिजवण्याच्या काही पद्धतींमुळे अन्नातली पोषणमूल्ये नष्ट होतात. काही वेळा अन्नपदार्थांमध्ये विषारी घटक तयार होतात. अन्न शिजविण्याच्या अशाच काही चुकीच्या पद्धतींविषयी जाणून घेऊया… (Food-Method-of-cooking-food-Nutritional-values-nad86)

तळल्यामुळे पदार्थांची चव वाढत असली तरी अन्न शिजविण्याची ही पद्धत चुकीची आहे. उच्च तापमानावर पदार्थ तळल्यामुळे त्यातली पोषणमूल्ये नष्ट होतात.
तळल्यामुळे अन्नातल्या कॅलरींचे प्रमाण वाढते. तळलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे तेलकट पदार्थ शक्यतो टाळायला हवे
मायक्रोवेव्हने स्वयंपाक घरात स्थान मिळवले आहे. सर्वसाधारणपणे मायक्रोवेव्हचा वापर अन्नपदार्थ गरम करण्यासाठी केला जातो. यामुळे अन्नातली पोषणमूल्ये नष्ट होतात.
ग्रील केलेल्या अन्नपदार्थांचे प्रस्थ वाढताना दिसत आहे. मात्र, सगळेच पदार्थ ग्रील करून खाऊ नये. भाज्या ग्रील करून खाता येतील. परंतु, मांस ग्रील करून खाऊ नका.
अन्नातल्या पोषक घटकांवर बऱ्याच बाबींचा परिणाम होतो. अन्न शिजविण्याची पद्धत, भांडी तसेच तेलामुळेही अन्नातले पोषक घटक कमी होऊ शकतात. त्यामुळे अन्न शिजवताना विशेष काळजी घ्यायला हवी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here