विज्ञान हे माणसासाठी एक सुंदर भेट आहे, आपण त्याचा चांगला वापर करायला हवा.स्वप्ने ती नाहीत जी आपल्याला झोपेत येतात, तर ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाही.येणाऱ्या पिढीची उद्याचे भविष्य घडवण्यासाठी, आपण आपला ‘आज त्यांच्यासाठी खर्च करू. यशाचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे घेण्यासाठी माणसाला अडचणी आवश्यक असतात.जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.प्रश्न विचारणे हे एका चांगल्या विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वाचे गुण वैशिष्ट्य असते. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रश्न विचारायला हवे. हिमालय पर्वत असो किंवा आपला व्यवसाय. त्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनत आणि शक्तीची आवश्यक असतेच.सत्याचा शोध हा खऱ्या अर्थाने शिक्षणानेच घेता येतो. ज्ञान आणि प्रबोधनाद्वारे चालणारा हा एक अविरत प्रवास आहे.आपण ठरवलेले ध्येय मिळेपर्यंत लढाई सोडू नका – आपण ते प्राप्त करू शकतो यावर विश्वास ठेवा. आयुष्यात एक ध्येय ठेवा, त्याविषयी सतत ज्ञान मिळवत रहा. कठोर परिश्रम करा आणि चांगले जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करा.स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी, आपण नवीन स्वप्ने पहायला हवी कुठलेही ध्येय मिळवण्यासाठी एका सर्जनशील नेतृत्वाची गरज असते. सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या समर्पित करत आहात.आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे.