बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सनॉनचा आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्ली येथे झाला.
तिचे वडिल राहुल सनॉन हे सी. ए आहेत. तर आई गीत या दिल्ली विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत.
क्रितीने नोएडामधील कॉलेजमध्ये बी.टेक केले आहे.
तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील करियरची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली.
सुपरस्टार महेश बाबूसोबत सायकॉलिजिकल थ्रिलर सिनेमा ‘१: नेनोक्कदिने’ या चित्रपटामधून क्रितीने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटामधून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
दिलवाले,राबता, बरेली की बर्फी, लुका छिपी, हाउसफुल, पानीपत या सुपर हिट चित्रपटांमध्ये क्रितीने काम केले आहे.
क्रितीचे मुंबईमधील जुहू येथे मोठे घर आहे.
क्रितीकडे Audi Q7 ही आलिशान गाडी देखील आहे.
लवकरच क्रितीचा ‘मिमी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here