टोकियो ऑलिम्पिकमध्ये चंदेरी कामगिरी करुन मायदेशी परतलेल्या मीराबाई चानूने माजी क्रीडा आणि युवा मंत्री किरन रिजजू यांची भेट घेतली. यावेळी विद्यमान क्रीडा मंत्र अनुराग ठाकूर देखील उपस्थितीत होते. माजी क्रीडा मंत्र्यांसोबत पदकाचा आनंद व्यक्त करताना मीराबाई चानू भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे खास स्वागत करण्यात आले.टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानुने वेटलिफ्टिंग प्रकारात सिल्वर मेडलची कमाई केलीये.माजी क्रीडा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मीराबाई चानूने पिझ्झा पार्टीचा आनंद घेतला.किरन रिजजू यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन चंदेरी गर्लसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.मायदेशी परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूने माजी क्रीडा मंत्र्यांसोबत पिझ्झाचा अस्वाद घेतला.