राज्यात अद्याप ही कोरोना निर्बंध कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील सांयकाळी चार नंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधींची धाब्यावर बसवले आहे. बार्शी विधानसभेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचे लग्न काल बार्शीतमध्ये पार पडले. अंत्यत थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी हजरोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंन्सचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता. पोलिसांनी केवळ योगेश पवार यांच्याच विरोधात आय़ोजक म्हणून गुन्हा नोंदविला आहे









Esakal