जर तुम्ही रेडीमेड किंवा ऑनलाइन डिझायनर ब्लॉऊज खरेदी करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहेत. हल्ली सिंपल साड्यांवर डिझायनर ब्लॉऊज घालण्याची फॅशन आली आहे. डिझायनर ब्लॉऊजमुळे साध्या साड्यांना वेगळा आणि हटके लुक मिळतो. बऱ्याचदा आपण ऑनलाइन किंवा फक्त आवडला म्हणून ब्लॉऊज खरेदी करतो. डिझायनर ब्लॉऊज हे रेडीमेडही मिळतात किंवा तुम्ही शिवूनही घेऊ शकता. जाणून घेऊया स्टायलिश ब्लॉऊज खरेदी करण्यापूर्वी या टिप्स.. (attention-buying-designer-blouses-marathi-news-jpd93)

फॅब्रिक

ब्लॉऊज खरेदी करताना त्याचे कापड बघून घ्या. बऱ्याचदा ऑनलाइन खरेदी कराताना आपण ऑर्डर देतो त्यापेक्षा वेगळे फॅब्रिक आपल्याला मिळते. जे एकदा वापरल्यावर खराब होते. त्यामुळे डिझायनर ब्लॉऊजमध्ये पैस खर्च करताना त्याचे फॅब्रिक उत्तम असेल याची काळजी घ्या.

माप

ब्लॉऊज खरेदी करताना आपल्या मापाचे योग्य ब्लॉऊज खरेदी करा. जर तुम्ही ऑनलाइन ब्लाऊज खरेदी करत असाल तर साइज चार्टमध्ये आपली योग्य साइज बघून नंतरच ऑर्डर करा. डिझायनर ब्लॉऊज जर मापाला बसले नाही तर त्या ब्लॉऊजचा सगळा लुक खराब होतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी असाल किंवा ऑफलाइन आपल्या साइज प्रमाणे ब्लॉऊज विकत घ्या.

रिव्ह्यू पाहा

ब्लॉऊजच नाही तर ऑनलाइन कोणतीही वस्तू घेण्याआधी त्या वस्तूच्या असलेले रिव्ह्यू नक्की वाचा. त्यामुळे वस्तू घ्यायची की नाही हे ठरवता येते. तुम्ही निवडलेल्या डिझायनर ब्लॉऊजचे रिव्हू वाचा, त्या ब्लॉऊजचे केवळ फोटो न पाहता इतरांनी त्यावर काय प्रतिक्रीया दिल्या आहेत हे वाचा आणि त्यानंतरच खरेदी करा.

Also Read: साडीत दिसायचंय खास…तर ट्राय करा ‘ब्रालेट ब्लाऊज’

रिटर्न पॉलिसी

डिझायनर ब्लॉऊजसाठी आपण पैसे खर्च करतो. कधी कधी आपण पाहिलेला किंवा आवडलेला ब्लॉऊज घरी आणल्यावर आपल्याला आवडत नाही. त्याचप्रमाणे आपण ऑर्डर केलेला ब्लॉऊज आणि आपल्याला डिलिव्हरी झालेला ब्लॉऊज यात खूप फरक असतो. त्यामुळे तो ब्लॉऊज आपल्याला परत करावा लागतो. अशा वेळी ऑनलाइन वेबसाइटर रिटर्न पॉलिसी आहे का? हे चेक करूनच ऑर्डर करा म्हणजे वस्तू आवडली नाही तर ती परत करता येते.

Also Read: सौंदर्यखणी : होळकर साम्राज्याचा ‘धागा’ असलेली महेश्वरी साडी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here