Tokyo Olympic : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची चर्चा सध्या सुरू आहे. खेळांच्या स्पर्धांना लोक जितके प्रेम देतात तितकेच प्रतिसाद प्रेक्षक खेळांवर आधारित चित्रपटांना देतात. पाहूयात असे काही कलाकार ज्यांनी पडद्यावर खेळाडूंची भूमिका साकारली.

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या जिवनावर आधारित चित्रपट ‘सायना’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील प्रमुख भूमिका परिणिती चोप्राने केली होती.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सुल्तान हा चित्रपट सुपर हिट ठरला. या चित्रपटामधील सलमानच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधले. गावात राहणाऱ्या सुल्तानचा सर्वसामान्य मुलगा ते कुस्तीपटू होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.
2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटामध्ये शाहरूख खानने हॉकी खेळाडूची भूमिका साकारली.
1956 मध्ये आशियाई स्पर्धेत स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या धावपटू फ्लाइंग सिख म्हणजेच मिल्खा सिंग यांच्या जिवनावर आधारित चित्रपट ‘मिल्खा सिंग’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तरने प्रमुख भूमिका साकारली.
2008 मध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरी कौम यांच्या जिवनावर आधारित ‘मेरी कौम’ या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राने प्रमुख भूमिका साकारली. तिच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
तुफान या चित्रपटामध्ये फरहानने अज्जू भाई नावाच्या बॉक्सरची भूमिका साकारली आहे. बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनेक संकटांना सामोरं जाणाऱ्या अज्जूच्या जिवनावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.
माजी कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या जिवनावर आधारित दंगल या चित्रपटामध्ये आमिर खानने महावीर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्या मुलींचा आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुल्तान या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. तिच्या या चित्रपटाती अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
दिग्दर्शक आकर्ष खुरानाचा ‘रश्मी रॉकेट’ या आगामी चित्रपटामध्ये तापसी पन्नू खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here