कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात.

रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्‍या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे.
गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती, तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार आहे. मीडियासमोरदेखीलं संजू आणि रणजीचं कौतुक होणार आहे. रणजीतच्या सुटकेमुळे कुसुमावती नक्कीच खूश होतील.
आता रणजीत – कुसुमावतीमधील अबोला संजू कधी आणि कसा दूर करेल, यानंतर गुलाब कोणतं नवं कारस्थान रचेल, अपर्णा – राजश्रीचे कारस्थान कधी घरच्यांच्या समोर येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मालिकेमधून मिळणार आहे.
राजा रानीची गं जोडी या मालिकेचा २९ आणि ३० जुलैचा विशेष भाग संध्याकाळी ७.०० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here