बेबड ओहोळ : थुगाव साकव पुलावरील तीन मो-या दुपारच्या सुमारास वाहुन गेल्याने हा पुल पुर्णता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेली तीन वर्षापासुन हा पुल बंद करण्यात आला होता. सुदैवाने या ठिकाणी कुठलाही जिवितहानी झालेली नाही. (Maval taluka Thugav Sakav bridge was carried away)
थुगावचा साकव पुलाचे बांधकाम ३५ वर्षापुर्वी करण्यात आले. त्यावेळेस असणारी वाहतुकीच्या विचाराने हा पुल बांधण्यात आला. हा पुल अवजड वाहने या करीता नसल्याने तो बैलगाडी, व हलकी वाहने यासाठी बांधला होता. माञ गेली पंधरा वर्षांत पवन मावळातील गावांचा ज्या पध्दतीने विकास झाला आहे तो खुप वेगात झाला. पुला जवळील परीसरात वाढलेली बांधकामे, वसतीकरण परिसरातील औद्योगिकरण यामुळे या पुलावरून मोठे अवजड वाहनांची वाहतुक गेली पंधरा वर्षांपासुन वाढली. अवजड वाहनांना परवानगी नसताना देखील मोठे वाळुचे ट्रक सतत जात असल्याने पुल लवकरच खिळखिळा झाला.

सततच्या अवजड वाहनांमुळे मो-या जिर्ण होवुन हळुवारपणे पडत गेल्या व मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरून वाहतुक बंद असा फलक पाटबंधारे विभागाने लावल्यानंतर वाहतुक बंद करण्यात आली. गेली तीन वर्षापासून पुल बंद असल्याने नागरीकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुल लवकर व्हावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती तीन वर्षापासुन कुठलीच हालचाल बांधकाम विभागाकडुन करण्यात आली नाही. नुकतेच आमदार सुनिल शेळके यांनी पवन मावळातील साकव पुलांची पहाणी केली त्यात थुगाव पुलाचाही समावेश होतो. त्यामुळे सध्या हा पुल धोकादायक असल्याने लवकरच पुलाचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. जवळील गावांमध्ये दळणवळणा करीता जवळचा मार्ग असल्याने सहा गावातील ग्रामस्थ दुचाकीवरून धोकादायक प्रवास करत होते. पण या पुलाची दोन मो-या वाहुन गेल्याने दुचाकी प्रवासही आता ग्रामस्थांचा बंद झाला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल दाभाडे यांनी सांगितले.
थुगाव पुलाची सद्यस्थिती
-
३५ वर्षापुर्वीचा जुना साकव पुल.
-
तीन मो-या वाहुन गेल्या नागरीकांचा संपर्क तुटला
-
सहा गावातील वाहतुकीसाठी महत्वाचा.
-
चारचाकी वाहनांना दहा किलोमीटर वेढा मारून जावे लागते.
Esakal