मुंबई – बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty) अद्याप क्लिन चीट मिळालेली नाही. तिच्या पतीला राज कुंद्राला पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करुन ते शेयर करणे याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीला दिलासा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. दुसरीकडे राज आणि शिल्पा यांच्या बँक अकाउंट देखील सील करण्यात आले आहे. अशावेळी कुठल्याच बाबतीत शिल्पाला दिलासा मिळण्याची संधी दिसत नाहीये. (clean chit not yet given to shilpa shetty in raj kundra case yst88)

अश्लील चित्रपट बनवणे आणि त्याचा प्रसार करणे असा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याप्रकरणावर एकाही बॉलीवूड सेलिब्रेटींनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. सगळेजण मौन बाळगून आहेत. राजच्या मागे पोलिसांचा ससेमिरा आहे. त्याची झाडाझडती घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा कसून तपास करण्यात येतोय. याअगोदर अनेक अभिनेत्रींनी राजवर आपल्याला त्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

shilpa shetty

मुंबई पोलिसांनी अधिक माहितीसाठी न्याय़ालयाकडे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र ती मागणी कोर्टानं नाकारली आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांचे असं म्हणणं आहे की, पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीला अद्याप न्यायालयानं क्लिन चिट दिलेली नाही. तिच्याकडे सर्व बाजुनं तपास केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.

Also Read: Movie Review: ‘मिमी’ मातृत्वाचं केलेलं ‘केविलवाणं’ हसं…

Also Read: ‘मी बेडकासारखी दिसतेय, आणि तुम्ही’ राधिकाचा फोटो व्हायरल

या प्रकरणामुळे शिल्पानं सुपर डान्स सारखा शो ही सोडला आहे. तिच्या ऐवजी करिश्मा कपूरनं कम बॅक केलं आहे. त्या शो मधील लोकप्रिय स्पर्धक म्हणून शिल्पाचे नाव घ्यावे लागेल. काही दिवसांपूर्वी तिचा हंगामा 2 नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा थोड्याफार प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. पतीवर झालेला आरोप आणि त्याला झालेली अटक यामुळे शिल्पाला मोठा धक्का बसला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here