मुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) ही सध्या चर्चेत आहे. तिच्या पतीला राज कुंद्राला (raj kundra) मुंबई पोलिसांनी (mumbai police) अटक केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शिल्पावरही झाला आहे. अनेकांनी तिला विनाकारण ट्रोल केले आहे. यासगळ्यात शिल्पा दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्यक्त झाली होती. तिनं आपण सध्या वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. हे सगळं भयानक असल्याचे सांगितले होते. शमिता शेट्टी या तिच्या बहिणीनं तिला आधार दिला होता. तिनं ही वेळ लवकरच निघून जाईल असं म्हटलं होतं.(shilpa shetty was not ready to get married before raj kundra relationship will not work yst88)
दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिल्पाचे व्हिडिओ, पोस्ट व्हायरल होत आहेत. अशीच तिची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात तिनं राजविषयी काही खुलासे केले होते शिल्पा आणि राजचे लग्न हे 2009 मध्ये झाले. वास्तविक राजचा हा दुसरा विवाह होता. त्याला दोन मुलंही आहेत. 2018 मध्ये राजनं एका मुलाखतीत असे सांगितले होते की, मी आणि शिल्पा आम्ही कसे भेटलो, आमच्यात प्रेम कसं झालं, तु शिल्पाला केव्हा भेटला यावर त्यानं सांगितलं, युकेमध्ये तेव्हा बिग ब्रदर सुरु होते.

शिल्पानं जेव्हा बिग ब्रदर जिंकले तेव्हा मी तिला भेटलो होतो. शिल्पाच्या मॅनेजरच्या मदतीनं मी तिला भेटलो होतो. मी तिच्याकडे एक परफ्युम बनविण्याची आयडीया घेऊन गेलो होतो. तेव्हा मी तिच्या आईच्या पाया पडलो होतो. ही गोष्ट शिल्पाला फार आवडली होती. आणि ती माझ्या प्रेमात पडली. अशी आठवण राजनं सांगितली. सध्या राजला पोलिसांनी पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. आणि तो न्यायालयीन कोठडीत आहे.
Also Read: राज कुंद्रा प्रकरणात शिल्पाला ‘क्लीन चिट’ नाहीच
Also Read: Movie Review: ‘मिमी’ मातृत्वाचं केलेलं ‘केविलवाणं’ हसं…
मात्र शिल्पा कोणत्याही प्रकारच्या नात्यामध्ये गुंतण्यास तयार नव्हती. त्याविषयी शिल्पा सांगते, मला कुठल्याही प्रकारच्या नात्यामध्ये अडकून पडायचे नव्हते. राजनं सांगितलं, मला माहिती आहे की, ती माझ्यावर प्रेम करते. आम्ही सुरुवातीला चांगले मित्र होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला वाटलं आपण प्रयत्न करुन पाहूया. शिल्पाला माझ्यावर पूर्ण विश्वास होता.
Esakal