राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिहिनं एका एसटी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर पाहून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याचं नाव प्रविण ज्ञानेश्वर लढी असं आहे. तो यवतमाळ आगारात कार्यरत होता.
यवतमाळ आगारातील एस. एस राठोड यांनी दिलेल्या अहवालानंतर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिवानह मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात ज्ञानेश्वर लढी यांनी व्हॅट्स अॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामध्ये लढी यांनी म्हटले होते की, ‘महा वसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्पोटके ठेवलायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायल्हर मिळत नाही. 100 कोटी वसुली सरकार.’
Also Read: ‘मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे’
तपासांमध्ये सहकार्य करत नसल्यचा ठपकाही लढी यांच्यावर ठेवण्यात आली आहे. 20 जुलै 2021 पासून लढी यांचं एसटीमधून निलंबन करण्यात आलं आहे. या कालावधीत त्यांना नियमांप्रमाणे निवार्ह भत्ता दिला जाणार आहे. तसेच निलंबन कालावधीत लढी यांनी यवतमाळ आगारामध्ये दररोज हजेरी लावावी, असेही अद्यदेशात म्हटलेय.
Also Read: ट्रक-बसचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी

Esakal