कोयनानगर (सातारा) : मी कोयनापुत्र असून, कोयना हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबावर कोसळलेले संकट अस्मानी सुलतानी संकट (Heavy Rain in Koynanagar) कोसळले आहे. कोयना परिवाराच्या पाचवीला संकटे पूजली असली, तरी आतापर्यंत कोयना परिवारातील प्रत्येकाने संकटाला धीराने तोंड दिले आहे. या संकटाला सुद्धा धीराने तोंड देऊन त्यावर मात करू, यासाठी शासन तुमच्या बरोबर आहे. पुनर्वसनाचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रसंगी कायदा बदलून काम करून कोयना पूरबाधितांना न्याय देऊ, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी आज दिली. (Koyna Landslide Inspection Of Mirgaon Humberli Dhokavale Villages By Minister Eknath Shinde bam92)

मी कोयनापुत्र असून, कोयना हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबावर कोसळलेले संकट अस्मानी सुलतानी संकट (Heavy Rain in Koynanagar) कोसळले आहे.

मुसळधार पावसाने कोयना विभागावर भूस्खलन (Koyna landslide) होऊन विभागातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे, बाजे, गोकुळनाला या गावांत झालेल्या हानीची पाहणी नगरविकासमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईवरून आणलेल्या मदतीचे वाटप त्यांनी केली. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या जनतेबरोबर त्यांनी कोयनानगर येथील मराठी शाळा व हुंबरळी येथे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार आनंदराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार, कॉँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, ठाण्याचे नगरसेवक शशिकांत जाधव, हुंबरळीच्या सरपंच रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कोयना विभागावर यापुढे संकट न येण्यासाठी सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करत आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी खर्च करायला शासन तयार आहे. या चार गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’’

Also Read: जिवाची पर्वा न करता चिमुकल्याला नदीपात्रातून काढलं सुखरूप बाहेर!

Mirgaon landslide

गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करताना धोकादायक जागेवर पुनर्वसन न करता सुरक्षित जागेची निवड ग्रामस्थांनी करावी. शासकीय जागा उपलब्ध नसतील तर खासगी जागा पसंत करावी. खासगी जागा खरेदी करण्यासाठी शासन खर्च करेल. मिरगाव, बाजे येथील बाधितांचे तात्पुरते स्थलांतर कोयना प्रकल्पाच्या मोकळ्या खोल्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोयना प्रकल्पाच्या १४६ मोडकळीस आलेल्या खोल्याची दुरुस्ती करून या बाधितांचे तात्पुरते स्थलांतर या ठिकाणी करण्यात येणार आहे.’’

Also Read: आंबेघरसह मिरगाव, ढोकवळेत 30 बेपत्तापैकी 29 मृतदेहांचा शोध

शंभूराजेंच्या मागणीनुसार कार्यवाही

गृहखात्याचा व्याप सांभाळणारे शंभूराज देसाई पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. सात दिवसांपासून ते कोयना विभागात तळ ठोकून आहेत. तालुक्यातील जनतेबरोबर कोयना परिवाराची ते काळजी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मी त्यांच्या संपर्कात असून, त्यांच्या मागणीनुसार कार्यवाही होत असल्याने लवकरच कोयना विभाग संकटमुक्त होईल, असा आशावाद मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Koyna Landslide Inspection Of Mirgaon Humberli Dhokavale Villages By Minister Eknath Shinde bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here