बॉलिवूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. पण नंतर मात्र त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला. पाहूयात असे काही सेलिब्रिटी ज्यांनी अभिनय क्षेत्रामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री आयशा टाकियाने चित्रपटांमधून ब्रेक घेतला असून ती सोशल मीडियावरून प्रेक्षकांच्या नेहमी भेटीस येत असते. आयशाने 2004 साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ या सुपर हिट चित्रपटामध्ये काम केले. होम डिलिव्हरी, शादी नंबर 1, सलाम ऐ इश्क या चित्रपटांमध्ये आयशाने काम केले.
अभिनेता झायेद खानने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झायेदला ‘मै हूं ना’ या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर झायेदने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला. नंतर त्याने ‘Born Free Entertainment ‘ या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. झायेद मलायका खानशी लग्न केले आहे. त्याला झिदान आणि अरीझ ही दोन मुलं आहेत.
#MeToo मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता देखील 2010 नंतर कोणत्याच चित्रपटामध्ये दिसली नाही. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातमधील इमरान हाश्मी आणि तनुश्रीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हॉर्न ओके प्लीज, अपार्टमेंट या चित्रपटांमध्ये तनुश्रीने काम केले आहे.
चित्रपटांमधून गायब झाल्यानंतर अभिनेता फरदीन खान आता अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. 2016 मध्ये फरदीनला त्याच्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर फरदीनने त्याच्या फिटनेस विशेष लक्ष दिले. केवळ सहा महिन्यामध्ये फरदीनने 18 किलो वजन कमी केले.
अभिनेत्री सेलिना जेटलीने देखील अभिनय क्षेत्रामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जानशीन’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 23 जुलै 2011 मध्ये सेलिनाने पीटर हागसोबत लग्न केले. तिला चार मुलं आहेत. सेलिना 2001 मध्ये ‘मिस-इंडिया’ झाली होती.
अभिनेत्री स्नेहा उल्लालने जेव्हा अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केले तेव्हा तिच्या दिसण्यामुळे लोकांनी तिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रॉयसोबत केली होती. स्नेहाने ‘लकी नो टाईम फोर लव्ह’ या चित्रटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘आर्यन,’ ‘क्लिक,’ ‘बेझुबान इश्क,’ या चित्रपटांमध्ये स्नेहाने काम केले आहे. बॉलिवूडबरोबरच तिने तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here