मुंबई: शहरातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल एक हजार दिवसांच्याही पार गेला आहे. मुंबईतील सर्व 24 प्रभागांमधील दुपटीचा दर 1,324 दिवस झाला आहे. तिसऱ्या लाटेची चिंता सतावत असताना कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. तशातच मुंबईत दररोज 25 ते 30 हजारांपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात असून पाचशेच्या आत रुग्णसंख्या नोंद होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (Big Relief from Mumbai People as Covid 19 Patients Doubling Rate gone beyond thousand days)

Also Read: भाजपा पूरग्रस्तांसाठी देणार आमदारांचा एक महिन्याचा पगार!

मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी ‘बी’ प्रभाग सँडहर्स्ट रोडमध्ये 4,756 दिवस झाला आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी ‘ए’ प्रभाग कुलाबा-फोर्ट 1,025 दिवस आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, ‘क्लोज कॉन्टॅक्ट’चा वेगाने शोध, निर्बंधांची कठोर अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. त्यासोबत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनीदेखील नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. पण असे असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कंबर कसली असून आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

Also Read: “लसींशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे…”; खान यांची मोदींवर टीका

गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या 300 ते 500 पर्यंत नोंद होते आहे. सोमवारी मागील पाच महिन्यात पहिल्यांदाच 299 सर्वात कमी रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही झपाट्याने वाढून 1324 दिवसांवर पोहचला आहे.24 दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 720 दिवसांवर होता. आता जवळपास दुपटीने वाढून 1324 दिवसांवर पोहचला आहे.

mumbai corona

Also Read: ‘वर्क फ्रॉम होम’च्या मुद्द्यावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबईतील सात वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी दीड हजारांपार गेला आहे. ‘बी’ वॉर्ड सँडहर्स्ट रोडने 4756 दिवसांसह रुग्ण दुपटीच्या कालावधीत आघाडी घेतली असून ‘सी’ प्रभाग मरीन लाइन्स 2758 दिवस, एफ/दक्षिण परळ 1976 दिवस, ‘एन’ प्रभाग घाटकोपर 1908 दिवस, पी/उत्तर मालाड 1834 दिवस, पी/दक्षिण गोरेगाव 1774 दिवस आणि ‘एल’ प्रभाग 1619 दिवस अशा 7 वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने दीड हजार दिवसांचा कालावधी नोंदवला आहे.

Also Read: मोठी बातमी- परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

  • एकूण रुग्ण – 7 लाख 34 हजार 761

  • आतापर्यंत डिस्चार्ज – 7 लाख 11 हजार 315

  • मृत्यू – 15789

  • सध्याचे सक्रिय रुग्ण – 5 हजार 267

  • बरे होणाऱ्या रुग्णांचा दर – 97 टक्के

  • कोविड वाढीचा दर – 0.05 टक्के

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here