औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेच्या (India’s Economy) वाढीबद्दलचा आपला मागील अंदाज कमी केला आहे. आयएमएफच्या नवीन अंदाजानुसार 2021-22 (FY22) आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर (Economic Growth) 9.5 टक्के राहील. तसेच कोरोनाच्या लसीकरणाच्या संथ वेग आणि दुसर्‍या लाटेमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होत आहे. त्यामुळे मागील 12.5 आर्थिक विकास दर कमी होऊन तो 9.5 टक्के राहील असं सांगितलं आहे.

IMf cuts India’s Economy growth Prediction

देशात मार्च-मे 2021 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक घडामोडी मंदावल्या होत्या. या धक्क्यातून सावरायला देशाला थोडा वेळ लागू शकतो, असंही नाणेनिधीने सांगितले आहे. आयएमएफच्या अंदाजातील ही कपात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का मानली जात आहे.

Also Read: Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

आयएमएफने 2021 साठी ग्लोबल ग्रोथ प्रोजेक्शनमध्ये (Global Growth Projection) 6 टक्क्यांची वाढ तशीच ठेवली आहे. त्याचबरोबर भारत आणि विकसनशील अर्थव्यवस्था, विशेषतः आशियासारख्या विकसनशील देशांसाठी आयएमएफने वाढीचा अंदाज कमी केला आहे. तर ज्या देशांत चांगल्या प्रमाणात लसीकरण झाले आहे त्या देशांचा आर्थिक विकास दर वाढेल असंही मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या काळात भारतातील लसीकरणाचा त्यावेळेसचा वेग पाहून देशाचा विकास दर 12.5 व्यक्त केला होता पण तो आता 9.5 टक्क्यांपर्यंत आणला आहे.

Also Read: शेअर बाजारातील IPO म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

नाणेनिधीच्या रिपोर्टनुसार, भारत आणि इंडोनेशिया समोर G-20 देशांचे आव्हान असेल. तर दुसऱ्या बाजून ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशात जिथं लसीकरणाचा वेग चांगला आहे तिथं नाममात्र परिणाम दिसेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here