नागपूर : अलीकडच्या काळात टॅटू काढण्याचा ट्रेंड फॅशन जगतात हिट ठरतोय. त्यातही जमाना मेटॅलिक टॅटूचा आहे. मेटॅलक टॅटू आता केसांच्या श्रृंगारातला खासमखास भाग बनला आहे. अलीकडच्या काळात मेटॅलिक टॅटू हा प्रकार जबरदस्त हिट ठरला आहे. देश-विदेशातल्या सेलिब्रेट्रींनी हे टॅटू अंगाखांद्यावर मिरवले. सोनेरी, चंदेरी आणि तांबूस रंगाचे हे टॅटू आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होते. आता या टॅटूंनी केसांवर स्थान पटकावला आहे. (Tattoos-Metallic-tattoos-Fashion-Tattoos-The-focus-of-tattoo-attraction-nad86)

अनेक महिला केसांवर मेटॅलिक टॅटू कॅरी करताना दिसत आहेत. हे टॅटू एखाद्या हेडबँडसारखे दिसतात.
सध्या नजरेत भरत असलेल्या टॅटूंना फ्लॅश टॅटू असे म्हटले जाते. हे टॅटू झटपट लावताही येतात आणि काढूनही टाकता येतात. ते तात्पुरते असतात. हा टॅटू पाच ते सात दिवसांपर्यंत टिकतो.
भारतीय महिलांच्या काळ्याभोर केसांवर मेटॅलिक टॅटू शोभून दिसतात. त्यातही सिल्व्हर आणि गोल्ड या रंगांची जास्त चलती आहे.
फ्लॅश टॅटू लावण्याआधी केस स्वच्छ धुवा आणि कंडिशनर वापरा. टॅटूची स्ट्रप केसांवर ठेवा.
ओलसर टॉवेल किंवा ओला कापूस घेऊन स्ट्रप थोडा वेळ दाबून ठेवा. आता वरचा कागद काढून टाका. केस धुतले की टॅटू निघून जाईल.
हे टॅटू स्ट्रेटनिंग केलेल्या केसांवर जास्त शोभून दिसतात. त्यामुळे ते लावण्याआधी केस स्ट्रेट करून घ्या. कर्ली केसांवर ते उठून दिसत नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here