मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी (bollywood khiladi) म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमारनं (akshay kumar) यापूर्वी देखील आपल्या सामाजिक दातृत्वाचा परिचय करुन दिला आहे. त्यानं कोरोनाच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यानं गेल्या वर्षी महापुराचा फटका बसलेल्यांना मदत केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत लोकांना सहकार्य करण्याची अक्षयची वृत्ती त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांसाठी देखील तो अनेकदा धावून आला आहे. आता अक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याची सहकार्यशीलता आहे. (akshay kumar donates rupees one crore for rebuilding school in kashmir yst88)

काश्मीरमध्ये एका शाळेसाठी त्यानं आपलं दातृत्व दाखवून दिलं आहे. त्याचं झालं असं की, गेल्या महिन्यात अक्षय काश्मिरमधील बीएसएफच्या जवानांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं तिथली एक शाळा पाहिली. आणि तेव्हा त्यानं त्या शाळेसाठी काही करायचं असा निर्णय घेतला. तो लागलीच अंमलातही आणला. त्यानं त्या शाळेसाठी चक्क एक कोटी रुपयांचे दान देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानं या कामाची कुठेही जाहिरात केलेली नाही. त्यानं स्वताहून त्या कामाची पोस्टही सोशल मीडियावर शेयर केली नाही.

akshay

त्यानं सोशल मीडियावर केवळ फोटो शेयर केले आहे. ज्यात तो भारतीय जवानांशी बातचीत करताना दिसतो आहे. त्यानं ज्या शाळेसाठी एक कोटी रुपये दिले. त्या शाळेचा कोनशिला कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याची माहिती बीएसएफनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन दिली आहे. अक्षयनं ज्या शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे ती शाळा काश्मीरमधील नीरू गावात आहे. त्या शाळेचे नाव अक्षयचे वडिल स्वर्गीय हरिओम भाटिया यांच्या नावानं ठेवण्यात आले आहे. शाळेचे पूर्ण नाव हरिओम भाटिया एज्युकेशन ब्लॉक गव्हर्नमेंट मिडल स्कुल नीरु असे आहे.

Also Read: ‘जिथं कामसुत्राचा जन्म, तिथं पॉर्नला बंदी, याचं आश्चर्य !’

Also Read: ‘राजनं नव्हे शिल्पानं सुचवलं नाव’, आणखी एका अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

सध्या अक्षयच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा सुर्यवंशम नावाचा चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेला नाही. चाहत्यांना त्याच्या या दोन्ही चित्रपटांची कमालीची उत्सुकता आहे. कोरोनाचा फटका त्याच्या या दोन्ही चित्रपटांना बसला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here