अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे फॉलोअर्सच्या बाबतीत अव्वल स्थानी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत मोदींनी विक्रम केला आहे. जगातील नेत्यांमध्ये ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून त्यांचे ट्विटरवर 7 कोटी फॉलोअर्स झाले आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे फॉलोअर्सच्या बाबतीत अव्वल आहेत. त्याआधी ट्रम्पच याबाबतीत आघाडीवर होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तीक अकाउंटचे 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख फॉलोअर्स होते.

Also Read: चीन बरोबर लष्करी चर्चेआधी भारताने पूर्व सीमेवर तैनात केली ‘राफेल’ फायटर विमाने

ट्रम्प यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असताना जगात सोशल मीडियावर सक्रीय नेत्यांमध्ये मोदी दुसऱ्या स्थानावर होते. मोदींच्या अकाउंटच्या फॉलोअरर्सची संख्या 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख इतकी होती. ती आता 7 कोटींवर पोहोचली आहे.

याआधी 2020 मध्ये पंतप्रधान मोदी चर्चेत होते. ट्विटर, यूट्युब, गुगल सर्चमध्ये ट्रेंडिग चार्टमध्ये ते आघाडीवर होते. एका अभ्यासात त्यावेळी मोदींची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 336 कोटी असल्याचं म्हटलं होतं. सोशल मीडियावर असलेली एंगेजमेंट आणि फॉलोअर्सची संख्या यावरून ब्रँड व्हॅल्यू ठरवण्या येते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here