कऱ्हाड (सातारा) : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील (Heavy Rain In Patan Taluka) रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही तासांत तालुक्यातील रस्ते, पूल वाहतुकीसाठी खुले करा. आपत्तीग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीने उभारणी करा, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी प्रशासनाला दिल्या. (Minister Shambhuraj Desai Meeting At Daulatnagar Regarding Floods In Patan Taluka bam92)
पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा विस्कळित झाला आहे.
दौलतनगर येथे मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता खलाटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खैरमोडे, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, कोयना धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता पोतदार, लघुसिंचन जलसंधारण प्रभारी कार्यकारी अभियंता पवार, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, व्ही. डी. शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्क करून तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत असून, मी स्वतः तालुक्यात ठाण मांडून जास्तीतजास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या ७२ तासांत उरलेली सर्व कामांची दुरुस्ती करून तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, पूल, वीज तातडीने पूर्ववत करण्यासाठी कामाला लागावे. स्थलांतरित नागरिकांसाठी तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची उभारणी करावी. यंत्रणेने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत.’’
Also Read: नैसर्गिक आपत्तीवर अभ्यास करणं गरजेचं : देवेंद्र फडणवीस
टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करा
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी. दुरुस्तीची कामे करत असताना कोणत्याही प्रकारची आडकाठी झाल्यास पोलिस यंत्रणासोबत घेऊन ती कामे पूर्ण करावी, अशाही सूचना मंत्री देसाई यांनी आज दिल्या.
Minister Shambhuraj Desai Meeting At Daulatnagar Regarding Floods In Patan Taluka bam92
Esakal