नाशिक : नाशिककरांना पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. (Gangapur-dam-80-percent-full-marathi-news-jpd93)

जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाने सातत्य राखले आहे. त्यामुळे गंगापूर धरण पाठोपाठ भावली, वालदेवी धरणही तुडुंब झाले आहे.
गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.
हा विसर्ग दुपारी ४ पर्यंत टप्याटप्याने ३००० क्यूसेक्स करण्यात येणार आहे.
नदी किनारी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.

खरिपाच्या ७९.५१ टक्के पेरण्या

जिल्ह्यात खरिपाच्या आतापर्यंत ७९.५१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भाताच्या रोपांची लागवड ६२ टक्क्यांच्या पुढे पोचली आहे. मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली असून, सर्वसाधारण ५५४ हेक्टरहून अधिक म्हणजेच, ९६२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. बाजरीचे पेरणी क्षेत्र ५९ टक्के झाले आहे. मक्याची लागवड १०६.६६ टक्के क्षेत्रावर झाली आहे. पेरणी झालेले तुरीचे क्षेत्र ६९.४०, मुगाचे ४०.१२, उडदाचे ४३.८२, भुईमुगाचे ८८.९६, सोयाबीनचे १२५ टक्के झाले आहे. कपाशीची लागवड ८४.८७ टक्के झाली आहे.

Also Read: नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

Also Read: नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here