सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील सहदेव दिर्दो या मुलाने गायलेल्या ‘बचपन का प्यार’ या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी ‘इन्स्टा रिल’ व्हिडीओ तयार करत आहे. काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध रॅपर (Badshah) बादशाहाने व्हिडीओ कॉलद्वारे सहदेवसोबत संवाद साधला होता. बादशहानं सहदेवला भेटण्यासाठी चंदीगडला बोलावलं आहे. बादशहा आणि सहदेव मिळून गाणं रेकॉर्ड करणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतक्या चर्चेत असणाऱ्या सहदेवच्या या गाण्यामुळे आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का (Anushka sharma) शर्माची झोप उडाली आहे.(baspan ka pyaar song blew bollywood actress anushka sharma sleep)
अनुष्काने नुकताच इन्स्टास्टोरीवर एक मजेशीर मीम शेअर केली आहे. यामध्ये दिसते की, एक व्यक्ती रात्री झेपण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या डोक्यात ‘बचपन का प्यार’ हे गाणे फिरायला लागते त्यामुळे त्याला झोप लागत नाही. या मीमसोबत अनुष्काने एक स्माईली देखील शेअर केला आहे.

Also Read: श्रेयस तळपदेच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन
व्हायरल झालेल्या ‘बचपन का प्यार’ या व्हिडीओत सहदेव शाळेचा गणवेश परिधान गाणे गाताना दिसत आहे. सहदेवचा हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. एका मुलाखतीत सहदेवने सांगितलं की त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरी टीव्ही, मोबाईल नसल्याचं त्याने सांगितलं. मोठं झाल्यावर गायक होण्याची इच्छा सहदेवने व्यक्त केली.
Also Read: गाडी की लक्झरी फ्लॅट?; पहा बॉलिवूड कलाकरांच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन
Esakal