कळणे (सिंधुदुर्ग) : कळणे खनिज प्रकल्पचा (Understanding Mineral Project )मातीचा बांध फुटल्याने हाहाकार उडाला.खनिजयुक्त मातीसह पाण्याचा मोठा प्रवाह वस्तीत घुसला.ही दुर्घटना सकाळी 8 च्या सुमारास घडली. सतर्कतेमुळे ग्रामस्थानी बचाव कार्य केल्याने अनेकांचे प्राण वाचले. शेती – बागायतीचे लाखोचे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे स्थानीकांत प्रचंड संताप व्यक्त होतं आहे. (Kalne-Mineral-Project-earthen-dam-burst-Sindhudurg-news-akb84)

कळणे येथे मायनिंग प्रकल्पाला मोठा विरोध झाला होता. यासाठी झालेले आंदोलन राज्यभर गाजले;मात्र हा प्रकल्प स्थानिकांकडून विरोध असूनही पुढे रेटून नेण्यात आला.आता येथे डोंगर पोखरून खनिज काढण्यात आले आहे .याचा मोठा फटका आजच्या दुर्घटनेने बसला.उत्खननामुळे डोंगरात मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात मोठा जलसाठा होता. हे पाणी खाली असलेल्या वस्तीत जावू नये म्हणून भिंत घातली होती.

पावसामुळे उत्खननात तयार झालेल्या दरडी पाण्यात कोसळून या भिंतीला भगदाड पडले. सुरवातीला लहान प्रवाह सुरु झाला. यानंतर स्थानिक जमले.खाली असलेल्या धोक्याच्या टप्प्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरवात केली. सकाळी 9 च्या सुमारास मोठा आवाज होऊन मोठे पाण्याचे लोट बाहेर पडू लागले. तीन तासाहून अधिक काळ पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत आहे. खनिज प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. ग्रामस्थानी घरातील, शेतातलील महिला, मुले वयोवृद्धा ना बाहेर काढले.यात उगाडे -कळणे रस्ता वाहून गेला .घटनास्थळी तहसीलदार, पोलीस दाखल झाले आहेत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here