तुम्हाला कदाचित वाचून आश्चर्य वाटेल, पण एखाद्या प्लेन साडीला (plain saree) सुध्दा तुम्ही डिझाइनर साडीमध्ये (designer saree) रूपांतरित करू शकता. हो हे खरं आहे…यामुळे तुमचे फक्त पैसेच वाचणार नाही..तर एका डिझाइनर महागड्या साडीचा लूकही मिळेल. तर, आज आम्ही तुम्हाला 500 रुपयांची साधी साडी 5000 रुपयांच्या डिझाइनर साडीमध्ये कशी रूपांतरित करू शकता. यासाठी काही टिप्स सांगत आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील (tips-to-change-plain-saree-into-designer-saree-jpd93)


साध्या साडीला डिझाइनर साडी बनवण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे. यासाठी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त पदराच्या खालच्या भागावर डिझाइनर बॉर्डर स्टिच करा. तुम्हाला दिसेल की तुमच्या साडीचा लूक पूर्णपणे बदलला असेल.

तुम्हाला कॅज्युअल साडीला डिझायनर टच द्यायचा असेल तर साडीच्या बॉर्डरला लेस लावायची चांगली कल्पना आहे. साडीचा रंग आणि पॅटर्ननुसार एम्ब्रॉडरी केलेल्या लेस आणि फ्लोरल लेस बॉर्डरसाठी वापरू शकता. तसेच तुम्ही कॉन्ट्रास्टिंग लेस देखील वापरू शकता आणि आपल्या साडीमध्ये विविध रंग वापरू शकता.
साधी साडी पार्टीवेअर करायची असेल तर पॅचवर्कचा वापर करणे एक चांगली कल्पना आहे. हेवी लूकसाठी प्रथम साडीला डिझायनर बॉर्डर लावा. यानंतर आपण पदरासाठी काही पॅचवर्क देखील स्टिच करू शकता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे पॅचवर्क पीस सहज उपलब्ध असतात. आपण त्यांना ऑनलाईन देखील खरेदी करू शकता.

जर तुम्हाला ऑफिससाठी एखादी डिझायनर साडी नेसायची असेल तर प्लेन साडीवर बॉर्डर स्किप करा आणि पदरावर मल्टीकलर पॅचवर्क लावा. हे आपल्याला एक मोहक आणि सुंदर लूक देईल.

जर डिझायनर साडीची आवडत असतील तर त्यात ‘हाफ एंड हाफ’ साड्या पसंत केल्या जातात. आपण ते घरी देखील तयार करू शकता. यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या दोन साड्यांचे भाग करा. उदाहरणार्थ, आपण हिरव्यासह निळा, पिवळ्यासह गुलाबी, आदी रंग निवडू शकता. फक्त हेच नाही तर आपण विविध फॅब्रिक्सचा देखील वापर करू शकता.

जर तुम्हाला स्टिचिंग येत नसेल किंवा प्लेन साडी एका वेगळ्या लुकमध्ये नेसायची असेल तर हा उत्तम मार्ग आहे. आपल्याला यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त डिझाइनर ब्लाउजसह आपली साधी साडी नेसा. आपण शोल्डर कट ब्लाउज पासून ते सिक्वेन्स ब्लाउज सह साड्या मॅच करू शकता.
Esakal