जळगावः भारतातील (India) छत्तीसगड (Chhattisgarh) हे राज्यात उत्तम पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. भरपूर जंगल या राज्यात असून दुर्मिळ डोंगर, धबधबे आणि वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय छत्तीसगड प्राचीन मंदिरे आणि स्मारका आहे. चला तर छत्तीसगडमधील काही उत्तम हिल स्टेशनविषयी (Hill station)माहिती जाणून घेऊया..

( chhattisgarh hill station famous destination)

अंबिकापूर हिल्स स्टेशन

छत्तीसगडमधील डोंगराळ भागांतील अंबिकापूरचे हिल स्टेशन प्रसिध्द आहे. येथे दाट जंगल उंच टोकदार टेकड्या पाहण्यास मिळतात. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलते हे ठिकाण पर्यटकांचे विशेष आवडीचे ठिकाण असून सुट्टी घालविण्याचे लोकप्रिय ठिकाण आहे. तसेच येथे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा देखील आनंद घेता येतो. तसेच तमोर पिंगला अभयारण्य अंबिकापुरात देखील आहे जिथे आपण फिरायला जाऊ शकता.

चिरमिरी हिल स्टेशन

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील चिरमिरा हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. असे छत्तीसगडचा स्वर्ग असेही म्हणतात. येथे हिरवळ, पर्वत आणि नद्याचे ठिकाणे भरपुर आहे. समुद्रसपाटीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले हे स्थान कोळसा खाणींसाठी देखील प्रसिद्ध आहे.

मेनपाट हिल्स स्टेशन

छत्तीसगडमध्ये मेनपाट हिल स्टेशनला ‘मिनी तिबेट’ म्हणून ओळखले जाते. बर्‍याच नद्या व घनदाट जंगल येथे असून कुटुंबासोबत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच स्थानिक आणि तिबेटियन संस्कृती आणि विविध परंपरा यांचे संगम पाहू शकता.

फिरण्यासाठी अन्य काही स्टेशन ठिकाण..

छत्तीसगड राज्यातील तीन हिल स्टेशनशिवाय बरीच विस्मयकारक ठिकाणे आहेत. त्यात भिल्लई, मल्हारचे ऐतिहासिक शहर, चित्रकूट धबधबे, अचनकमार व्याघ्र प्रकल्प, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान आणि कोतूसमर लेणी यासारख्या नैसर्गिक स्थळांनाही कौटुंबिक सहल भेट देता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here