भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावरील एका पोस्टने फुकटचा वाद ओढावून घेतलाय. इंग्लंड दौऱ्यावर कसोटीची तयारी करत असलेल्या विराट कोहलीने एका खासगी युनिवर्सिटीचे प्रमोशन केले होते. या पोस्टमध्ये त्याने ऑलिम्पिकचाही उल्लेख केला होता. विराट कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केलयाचे पाहायला मिळाले. (Virat Kohli Social Media Post Controversy olympics private university)

त्यानंतर आता कोहलीच्या या पोस्टवर जाहिरात क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ‘आस्की’ने (अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया) देखील आक्षेप नोंदवलाय. जाहिरात नियमन संस्थेकडून विराट कोहलीला नोटीस बजावली जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने या पोस्टच्या माध्यमातून जाहिरात नियमांचे उल्लंघन केले आहे. ही पेड जाहिरात असल्याचा कोणताही उल्लेख पोस्टमध्ये केला नव्हताॉ. यासंदर्भतील डिस्क्लेमर नसल्यामुळे विराट कोहलीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. ASCI अधिकाऱ्यांनी याचे संकेतही दिले आहेत.

Also Read: SL vs IND : 21 व्या शतकात जन्मलेल्या पदिक्कलचा खास रेकॉर्ड

काय आहे वादाचं कारण

विराट कोहलीने ऑलिम्पिकचा उल्लेख करत इन्टाग्रामवरुन जी पोस्ट शेअर केली होती त्यात लिहिलं होतं की, भारतात आणखी 10 LPU ची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एलपीयूतील 11 विद्यार्थांना शुभेच्छा! हे एक मोठं यश आहे. विराट कोहलीने या पोस्टच्या माध्यमातून लवली प्रोफेशनल युनिवर्सिटीची जाहिरात केली होती. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले होते.

Also Read: विराट कोहली अडकला नव्या वादात;पाहा व्हिडिओ

विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनं टीम इंडिया दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेय

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here