रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे पाडावेवाडीतील त्या शाळकरी मुलाची हत्या अवघ्या सातशे रुपयांसाठी त्याच्याच अल्पवयीन मित्राने केल्याची माहिती पुढे आली आहे. मिरजोळे-घवाळीवाडीतील सड्यावर नेऊन आधी गळा दाबून खून केला आणि त्यानंतर अंगावर दगड टाकून ठेचल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत रविवारी (ता. २३) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या अल्पवयीन मित्राकडून प्रात्यक्षिक करून घेतले. त्यात हा प्रकार उघडकीस आला. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिरजोळे-पाडावेवाडी येथून निखिल अरुण कांबळे हा ११ फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. शनिवारी (ता. २२) सकाळी घवाळीवाडी येथे एक मृतदेह आढळून आला होता. अंगावरील कपडे, शाळेची बॅग यावरून तो मृतदेह निखिलचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना निखिलच्या एका अल्पवयीन मित्रावर संशय आला होता. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हत्या केल्याचे त्याने कबूल केले. निखिलकडून त्या अल्पवयीन मित्राने एक हजार रुपये घेतले होते. त्यातील ३०० रुपये त्याने परत केले.
हेही वाचा- सावधान ! धुळीने होतोय श्वसनाचा धोका..
पैशावरून झाली बाचाबाची
उर्वरित सातशे रुपये देण्यासाठी निखिलने तगादा लावला होता; परंतु त्या मित्राकडे परत देण्यासाठी पैसे नव्हते. वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे कंटाळून निखिलच्या हत्येचा कट त्याने रचला. ११ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता निखिल शिकवणीला जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यावेळी तो मित्र वाटेत भेटला. तो निखिलला घेऊन पाडावेवाडीतील जंगलातून घवाळीवाडी सडा येथे
पोहोचला. तेथे पुन्हा दोघांमध्ये पैशावरून बाचाबाची झाली. त्यावेळी मित्राने निखिलचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली.
हेही वाचा- सिंधुदुर्गात भेरली माडचे अस्तित्व धोक्यात…
मौजमजेसाठी मित्राचा केला घात
त्याच्या मृतदेहावर दगड टाकून ठेचला. मृतदेह एका खड्ड्यात ठेवून त्यावर मोठे दगड ठेवले. त्यामुळे मृतदेह कोणालाही सहज दिसणार नाही याची काळजी त्याने घेतली. निखिलची शाळेची बॅग जवळच्या बांधापलीकडे गवतात फेकून दिली. हत्या करणाऱ्या अल्पवयीन तरुणाने नववीतून शाळा सोडली होती. मौजमजेसाठी त्याने निखिलकडून पैसे घेतल्याचेही त्याने कबूल केले. रविवारी पोलिसांनी त्याच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतल्यानंतर त्या प्रकाराने पोलिसही हादरले होते. हा प्रकार करताना अन्य कोणालाही सोबत घेतले नसल्याचेही चौकशीतून स्पष्ट झाले आहे. दोघांच्या संपर्कात असलेल्या मित्रांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
हेही वाचा- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे स्वप्न अधुरेच…
आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
निखिलची हत्या झाल्याचे समजल्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. तेव्हा दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. रविवारी (ता. २३) सकाळी पालकांसह नातेवाईकांनी अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. त्यानंतर श्री. गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केल्यानंतर नातेवाईकांनी निखिलचा मृतदेह ताब्यात घेतला.

News Story Feeds