औरंगाबाद: Windlas Biotech IPO Update: औषध निर्माती कंपनी Windlas Biotech ही 401.53 कोटी रुपये गोळा करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी आयपीओ मार्केटमध्ये आणणार आहे. या कंपनीचा आयपीओ 4 ऑगस्ट रोजी खरेदीसाठी उघडेल आणि 6 ऑगस्ट रोजी बंद होईल. या वर्षीचा हा 31 वा आयपीओ (31st IPO in 2021) आहे. कंपनीने इश्यू प्राइस बँड 448-460 रुपये ठेवला आहे. एका लॉटमध्ये 30 शेअर्स असणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीचे किमान 30 शेअर्स किंवा त्याच्या गुणात्मक शेअर्स खरेदी करता येणार आहेत.

windlas ipo

Windlas Biotech आयपीओतून 165 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स बाजारात आणणार आहे. तर 51.42 लाख इक्विटी शेयर्ससाठी ऑफर फॉर सेल असतील. त्याअंतर्गत प्रमोटर विमला विंदलास त्यांच्याकडील 11.36 लाख इक्विटी शेअर विकेल. तसेच Tano India Private Equity fund II ही त्यांचे 40.6 लाख इक्विटी शेअर्स विकेल. एसबीआय कॅपिटल मार्केट (SBI Captial Markets), डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स (DAM Capital Advisors) आणि आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL Securities) बुक रनिंगसाठी लीड मॅनेजर आहेत.

आयपीओच्या 50% पेक्षा जास्त भाग क्यूआयबीसाठी (qualified institutional buyer) राखीव नसतील. त्यातील 50 टक्के शेअर्स QIB साठी राखीव असतील. त्याचबरोबर एनआयआयसाठी (Non-institutional investors- NII) 15 टक्के शेअर्स राखीव राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 35 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहेत. या आयपीओची खास गोष्ट अशी की अद्याप कोणतीही फार्मा कंपनी सूचीबद्ध नाही. जर Windlas लिस्ट झाली तर ती प्रथम लिस्टेड कंपनी असेल.

आयपीओच्या 50% पेक्षा जास्त भाग क्यूआयबीसाठी (qualified institutional buyer) राखीव नसतील

कंपनी देशातील फार्मास्युटिकल्स फॉर्म्युलेशन कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनच्या ( CDMO) सर्वात मोठ्या पाच कंपन्यांपैकी एक आहे. उत्पादनाच्या संशोधनापासून त्याचा विकास, परवाना देणे व विक्री यामध्ये जेनेरिक उत्पादने यासह कॉम्पलेक्स जेनेरिक उत्पादनांचा विकास, परवाना आणि विक्री ही कंपनी करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here