नागपूर : चुकीच्या प्रसाधनांच्या वापरामुळे अथवा अयोग्य पद्धतीने प्रसाधने वापरल्यामुळे त्वचेस त्रास होण्याची शक्यता असते. त्वचेवर रॅशेस येणे, त्वचा डागाळणे, मुरूम येणे, त्वचा काळवंडणे यासारख्या लक्षणांवरून ही समस्या लक्षात येते. त्यावर तातडीने उपाय करायला हवेत. (Facial-hygiene-Skin-problems-Beauty-Tips-nad86)
डिओ स्प्रे करताना अनेकदा चेहऱ्यावरही शिंतोडे उडतात. ते जास्त प्रमाणात असतील तर चेहऱ्याची जळजळ होऊ शकते. हे टाळायचे तर सर्वप्रथम प्रभावत त्वचा थंड पाण्याने धुवावी. त्याने आराम वाटला नाही तर रुमालात बर्फ गुंडाळून त्वचेवर फिरवावा.टूथपेस्ट दात स्वच्छ करण्यासोबतच सौंदर्यवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावते. चेहऱ्यावरील मुरुमांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्यावर रात्रभर टूथपेस्ट लावून ठेवावी. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे मुरुमांचा त्रास कमी होईल.बरेचदा नखं काळवंडतात. निस्तेज दिसतात. त्यावर पांढुरके डाग दिसतात. ते घालवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर पेस्ट घेऊन नखांवर घासावी. नखं चमकदार होतात.