फॅशन ही एक लोकप्रिय शैली आहे ती कधीच मागे राहत नाही. फॅशन ट्रेंड दररोज बदलतात, ते अपरिवर्तित राहू शकत नाहीत. सध्या अनेकजण फॅशन ट्रेंड फॉलो करत आहेत. काहींचा स्टाईल स्टेटमेंट अतिशय साधं पण आकर्षक असतो. साध्या लुकनं देखील चाहत्यांना कसं आकर्षिक करायचं काहींना व्यवस्थित जमत. तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या स्टाईल ड्रेसिंग करायची असेल या ट्रेंड जरूर फॉलो करा.

अनारकली ड्रेस: मार्केटमध्ये अनारकली ड्रेसच्या या पॅटर्नचे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर ड्रेस तुम्हाला सहजरित्या मिळतील. या लुकसह आपण मॅचिंग ज्वेलरी देखील खरेदी करू शकता.
ऑफ शोल्डर गाऊन:
जर आपण एखाद्या समारंभात जाण्यासाठी तयार होत आहात तर आपण ऑफ शोल्डर गाऊन देखील घालू शकता. हे आपल्यावर छान दिसेल आणि यामुळे वेस्टर्न लूक देखील चांगला येईल.
धोती साडी : ‘धोती साडी’ सध्या लोकप्रिय होतेय. बॉलिवूड तारकाही हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ही धोती साडी कॉलेज इव्हेंट्स, पार्ट्यांमध्येही तरुणींनी नेसलेली पाहायला मिळतेय. दिसायला अगदी नऊवारी साडीसारखी असली, तरी नेसण्याची पद्धत मात्र काहीशी निराळी.
फिट मिडी:
फिट मिडी ही ड्रेसिंग केल्यावर हटके लूक दिसतो. हे स्लीव्हलेस डिझाइन तसेच सूती फॅब्रिकचे बनलेले आहे. सध्या याचा सुद्धा बोलबाला जोमाने सुरूय
ब्लॅक शॉर्ट ड्रेस:
ब्लॅक रंगाची शॉर्ट ड्रेस घालून आपण मॅचिंग हेयरबॅन्ड लावून आपल्या लुकला अजून छान करू शकता. या सह आपण स्नीकर्स घातल्याने आपले लूक अधिकच मस्त दिसेल.
लॉन्ग मॅक्सी ड्रेस:
हा एक लॉन्ग मॅक्सी ड्रेस आहे. या ड्रेसमध्ये अनेक डिझाईन प्रिंट केल्या आहेत. त्यास बोट नेक, फुल स्लीव्हसुद्धा आहे. हे परिधान करण्यासाठी खूप आरामदायक आणि स्टाईलिश आहे.
वेस्टर्न शरारा सूट: वेस्टर्न शरारासोबत मेटलच्या हिरव्या बांगड्या परिधान केल्या पाहिजे. यामुळे एक परफेक्ट लूक मिळतो.
शरारा आणि गरारा : शरारा आणि गरारा या आउटफिटचा ट्रेंड बाजारात पुन्हा पाहायला मिळत आहे. हल्ली कित्येक स्टार मंडळी देखील हे आउटफिट परिधान करताना दिसताहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here