यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो, असं आपण अनेकदा ऐकलंय. अभिनेता सोनू सूदच्या बाबतीत ही ओळ तंतोतंत लागू होते.

कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी ‘देवदूत’ ठरला. परोपकाराच्या या कामात त्याची पत्नी सोनाली हिने त्याला मोलाची साथ दिली.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी शिक्षण घेत असताना सोनूची सोनालीशी पहिली भेट झाली. सोनू नागपूरमध्ये इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत असताना सोनालीला पहिल्यांदा भेटला.
त्यावेळी सोनाली एमबीएचं शिक्षण घेत होती. या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
सोनू आणि सोनालीने २५ सप्टेंबर १९९६ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुलं आहेत.
सोनू पंजाबी तर सोनाली तेलुगू भाषिक आहे. ती इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून लांब राहणं पसंत करते.
वीस वर्षांहून अधिक काळापासून ही जोडी एकत्र असून एकमेकांच्या सुखदु:खात साथ देत आहेत.
सोनालीच सोनूचं पहिलं प्रेम होतं, असं म्हटलं जातं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here