कोथरुड : ”पुणवडी ते पुणे हा पुणेकरांच्या कष्टाचा, मेहनतीचा. स्वप्नपुर्तीचा प्रवास आहे. आजच्या मेट्रो ट्रायल रनमुळे पुण्याला आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पुर्ण होतेय याचा आम्हाला आनंद आहे” अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व- पश्चिम वनाज ते रामवाडी मार्गिकेतील वनाज ते आयडीयल कॉलनी या पुणे मेट्रोच्या प्रथम ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, निलम गो-हे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित व्यासपीठावर उपस्थित होते.

Also Read: अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली पुणे मेट्रोची ट्रायल रन

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ”उद्याची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत चला हा शरद पवार साहेबांचा सल्ला डोळ्यासमोर ठेवून विकास कामे सुरु आहेत. मोठे विकासाचे प्रकल्प मग ते महाराष्ट्रातील कोणत्याही भागातले असो,  राज्यसरकारचा हिस्सा कमी पडू द्यायचा नाही ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. देशातील चांगले शहर, सर्व सोयीयुक्त शहर असा लौकिक वाढला पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता केला जाईल” असा आमचा मानस राहील.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, निलम गो-हे यांनी आपले विचार व्यक्त केले.

पुणे बनणार सर्वोत्तम महानगर

”पुणे शहर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ६९१५ चौ. की. मी. असून राज्यातील सर्वात मोठे पीएमआरडीए होणार आहे. देशातले तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र असणार आहे ”असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए प्रारुप विकास आराखड्यातील विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.  ”२ रींगरोड, हायस्पीड रेल्वे, क्रिसेंट रेल्वे, दहा मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, चार प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यंटन स्थळे, तीन सर्किट, पाच शैक्षणिक केंद्रे, दोन वैद्यकीय संशोधन केंद्रे, सात अपघात उपचार केंद्रे, ८ जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया व संशोधन केंद्र, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्र, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगररचना योजना, ४ कृषी उत्पन्न बाजार केंद्र, ५ प्रादेशिक उदयाने, १६ नागरी उद्याने, चार अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्रिशमन केंद्रे दोन औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्रे,एक व्यवसाय केंद्र केले जाणार आहे. आजच्या घडीला याला ७५ हजार कोटी रुपये लागणार आहे. टप्प्याटप्याने हे प्रकल्प पुर्ण करण्यासाठीचे नियोजन केलेले आहे.” असेही त्यांनी सांगितले.

Also Read: आपल्या हद्दीत पैसे का द्यायचे? महिला पोलिस अधिकाऱ्याचा Audio viral

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here