पहिल्या सलग तीन सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला, भारतीय महिला संघाने शुक्रवारी झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या लढतीत 1-0 असा विजय नोंदवत स्पर्धेतील आशा पल्लवित ठेवल्या आहेत. या सामन्यात नवनीतने 57 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. या गोलपूर्वी भारतीय महिला संघाला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण याचा संघाला फायदा करुन घेता आला नाही. (olympics 2021 hockey indian womens hockey team keeps hopes alive by defeating ireland)

पहिल्या सामन्यात वर्ल्ड नंबर वन नेदरलँडने भारतीय महिला संघाला 5-1 अशी मात दिली होती. जर्मनीकडून रानी रामपालच्या ताफ्याला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. ऑलिम्पिकचा गत चॅम्पियन ब्रिटन महिला संघाने भारतीय महिलांना 4-1 असे नमवले होते. या तीन पराभवातून सावरत भारतीय महिलांनी चौथ्या सामन्यात विजय नोंदवलाय.

Also Read: Olympics : लोविनाचा पदकी पंच! (VIDEO)

ऑलिम्पिक स्पर्धेत 12 देशांनी सहभाग घेतला असून प्रत्येकी गटात 6-6 संघ आहेत. चौथ्या सामन्यातील पहिल्या विजयानंतर भारतीय महिला संघ अ गटात पाचव्या स्थानावर आहे. शनिवारी भारतीय महिला संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. स्पर्धेतील हा शेवटचा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश करण्याची भारतीय महिलाला संधी असेल. पण केवळ दक्षिण आफ्रिके विरुद्धचा सामना जिंकून चालणार नाही. तर गोल सरासरीही उत्तम ठेवावी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की, सामना जिंकला म्हणजे बाद फेरीसाठी पात्र एवढेच सोपे समीकरणही नाही.

Also Read: Olympics : ‘आर्मी मॅन खली’ पदकापासून एक पाउल दूर (VIDEO)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकून भारतीय महिला संघाला ब्रिटन आणि आयर्लंड यांच्या सामन्याचा निकालाची प्रतिक्षा करावी लागेल. ब्रिटन महिलांनी आयर्लंडला पराभूत केले तरच भारतीय संघाचा प्रवास अखंडीत सुरु राहिल. 36 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय महिला संघ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी महिला संघाला साखळी फेरीत एकही सामना जिंकता आला नाही. यावेळी सलगत तीन पराभवातून सावरत रानीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पहिला विजय नोंदवलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील विजय आणि जर-तरची समीकरणे रानीच सम्राज्य टिकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरुन भारतीय महिलांनी आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. यात आणखी ट्विस्ट निर्माण झाला तर निश्चितच भारतीय महिला हॉकीसाठी एक आनंददायी क्षण असेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here