कोथरुड : ताई, बघ मेट्रो (Metro) आली. हॉर्नचा आवाज आला म्हणून पुलाकडे लक्ष गेल्यावर शास्रीनगर (shashtrinagar) येथे राहणा-या केतकी किरवेने आपल्या मोठ्या ताईला ओरडून सांगितले. चौथीत शिकणा-या केतकीला मेट्रोचे (metro) मोठे कौतुक वाटत होते. केतकी म्हणाली आता मी, मेट्रोमध्ये (metro) बसूनच शाळेला जाणार. (pune metro trial run today)

कोथरुडमध्ये मेट्रोचे (kothrud metro) ट्रायल रन झाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मेट्रो कधी धावणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. आज सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या संपन्न झाली. वनाज ते आयडीयल कॉलनीकडे सकाळी सव्वा सातच्या सुमारास मेट्रोने प्रयाण केले. पुलावरुन निघालेल्या मेट्रोने सर्वांचेच लक्ष वेधले.

पुण्याची सांस्कृतिक ओळख दर्शवणारी चित्रे असलेली मेट्रोची धाव पौडरस्त्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांना मेट्रोत बसून शाळेत जाता येईल म्हणून आनंद वाटत होता. तर वनाजच्या मजूर अड्ड्यावर काम मिळेल म्हणून आशेने थांबलेल्या चंदन नानावत सारख्या कामगारांना आपल्याला चांगला रोजगार मिळेल असा उत्साह देत होता.

Also Read: पुणे मेट्रोच्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला उपमुख्यमंत्र्याचा हिरवा कंदील, पाहा फोटो

कंत्राटी सफाई कामगार असलेले विकी कांबळे म्हणाले की, कोथरुडमध्ये बेरोजगारांची संख्या भरपूर आहे. कामगारांना कायम स्वरुपी काम मिळाले तर आमची पण जिंदगाणी बदलून जाईल. मेट्रोमध्ये कामगार भरतीत स्थानिकांना पण रोजगार मिळावा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here