दहिवडी (सातारा) : सरकार कोणाचेही असो, कायमस्वरूपी पाण्यासाठीचा आपला संघर्ष थांबणार नाही. आपलं पाणी आता कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही मात्र काम करणाऱ्या माणसांच्या मागे खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष आमदार महादेव जानकर (MLA Mahadev Jankar) यांनी केले. वरकुटे-मलवडी येथील तुटका कडा तलावात आलेल्या तारळी पाणी योजनेच्या (Tarli Water Scheme) पाण्याचे पूजन भोजलिंग पाणी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या हस्ते केल्यानंतर आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. (MLA Mahadev Jankar Warns Thackeray Government Over Tarli Water Scheme Issue bam92)

सरकार कोणाचेही असो, कायमस्वरूपी पाण्यासाठीचा आपला संघर्ष थांबणार नाही.

Also Read: ..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

आमदार जानकर म्हणाले, ‘‘तारळी योजनेचे पाणी तुटका कडा तलावात (Tutka Kada Lake) आल्याने हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अनिल देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळे व चिकाटीमुळे हे शक्य झाले आहे. या योजनेचा सर्व्हे मी मंत्री असताना करून घेतला होता. मात्र, आम्हाला फक्त पिण्यासाठी नव्हे, तर शेतीसाठी पाणी पाहिजे. पाणी येऊन इथला शेतकरी सधन झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे.’’

अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, ‘आज या परिसरासाठी अतिशय भाग्याचा दिवस असून, यापुढे आपल्याला कधीही पाण्यासाठी टँकरची गरज लागणार नाही. वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, कुरणेवाडी गावांचा तारळी योजनेत कायमस्वरूपी समावेश व्हावा व शेनवडी गाव आणि पडळकर खडक तलावमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी आमचा लढा यापुढेही सुरू राहणार आहे. कुकुडवाड गटात सर्वत्र पाणी खेळलेले आहेच. यासोबत गावागावांत विकासकामे करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’ डॉ. संदीप पोळ म्हणाले, ‘आमदार महादेव जानकर यांनी सामान्य माणसांच्या हितासाठी अन्‌ माण तालुक्याच्या विकासासाठी फक्त पाणी चळवळीचेच नव्हे तर माणचे नेतृत्व करावे.’’ सन २०१३ मध्ये अनेक अडथळ्यांवर मात करत तुटका कडा तलाव बांधण्यात आम्हाला यश आले. त्यावेळी या तलावाचा तारळी योजनेचे पाणी साठविण्यासाठी उपयोग होईल, असा विचारही केला नव्हता. पण, सामाजिक कार्यकर्ते भारत अनुसे व बापूराव बनगर यांनी तारळी योजनेचे पाणी या तलावात कसे आणता येईल, याची सर्वप्रथम वाट दाखवली. त्यामुळे तारळी योजनेचे खरे वाटाडे हे दोघे आहेत.

Also Read: पती, सासू-सासऱ्यांचं ऐकून शेतकरी महिला बनली 100 गाईंची पालक

या वेळी अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ, तानाजी काटकर, दत्तात्रय सोनवणे, दादासाहेब दोरगे, बाळासाहेब जगताप, खंडेराव जगताप, भारत अनुसे, बापूराव बनगर, सचिन होनमाने, सुरेश बनगर, सतीश जगताप, कुंडलिक यादव, रमेश यादव, जालिंदर खरात, प्रल्हाद अनुसे, कमीर इनामदार, धनाजी शिंदे, दिलीप वाघमोडे, सागर बनगर, दादासाहेब शिंदे, रफिक मुलाणी, पिंटू जगदाळे, उदय जगदाळे, किरण जगदाळे, बाबाराजे हुलगे, रामचंद्र झिमल, डॉ. नानासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

MLA Mahadev Jankar Warns Thackeray Government Over Tarli Water Scheme Issue bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here