औरंगाबाद : बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वादिष्ट असे सूप बनवण्यासाठी कोणते मापक आहेत? याचे उत्तरही तुम्हीच देत असाल. त्यामुळे आज तुम्हाला आम्ही किचन टीप्स सांगणार आहोत. त्याचा वापर करुन तुम्ही सूप स्वादिष्ट बनवाल. काही पार्ट्यांमध्ये प्रामुख्याने त्याचा समावेश होतो. विशेषतः जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर सूपचा आस्वाद घेतला जातो. तर चला टीप्स विषयी जाणून घेऊ या…

क्रिम टाकल्याने सूपची चव वाढते.

क्रिमचा करा वापर

कोणत्याही सूपची चव वाढवण्यासाठी क्रिमचा वापर करणे हा एक चांगला मार्ग आहे. जर तुम्ही टोमॅटोचे सूप बनवत असाल तर ते बनवून झाल्यांतर वरुन एक-दोन चमचे क्रिम टाकू शकता. त्याने सूपची चव वाढेल. अशाच प्रकारे इतर सूप बनवत असाल तर क्रिमचा वापर करा. मांसाहारी सूपमध्येही त्याचा वापर तुम्ही करु शकता.

नारळ व साध्या दुधाचा वापर तुम्ही सूपमध्ये करु शकता.

नारळ व साधे दुध

कोणतेही सूप असो त्याची चव वाढवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे नारळ किंवा साध्या दुधाचा वापर करणे. जर तुम्ही साग किंवा एखादी हिरव्या भाजीचे सूप तयार करत असाल तर तेव्हा त्यांचा वापर करु शकता. याने सूपची चव वाढेल. ब्रोकाली, सोया किंवा पत्ता कोबीचे सूप बनवत असाल तर तुम्ही नारळ किंवा साध्या दुधाचा वापर करु शकता.

काळी मिरची पावडर आणि हिंगचा वापर

काळी मिरची पावडर आणि हिंगचा वापर

कोणत्याही सूपची चव वाढवण्यासाठी केवळ मीठ किंवा मसालाच पुरेसा नसतो. जर तुम्हाला सूपची चव वाढवायची असेल तर काळी मिरची पावडर आणि हिंगाचा वापर करा. सूप बनवण्याच्या सुरुवातीलाच ते टाका. जर तुम्ही तांदळाच्या पाण्याचे सूप बनवत असाल तर काळी मिरची आणि हिंगाबरोबर एक ते दोन चमचे काॅर्न फ्लोअरही वापरु शकता.

काजू पेस्ट वापरा

काजू पेस्ट वापरा

जर तुम्ही पत्ता कोबीचे सूप बनवत असाल तर तिचे वाढवण्यासाठी काजू पेस्टचा वापर करु शकता. इतर सूपमध्येही तिचा वापर करु शकता. या व्यतिरिक्त सूप घट्ट करण्यासाठी १ ते २ उकडलेले बटाटे बारीक करुन टाकू शकता. या सर्व सूपमध्ये एक ते दोन चुटकी दालचिनी पावडरही वापरु शकता. याने सूपची चव वाढेल. जर सूप पातळ झाला तर तुम्ही दही किंवा योगर्टचाही वापर करु शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here