ढेबेवाडी (सातारा) : घराच्या समोरूनच दोन पाळीव कुत्री फरफटत घेऊन निघालेल्या बिबट्याचा (Leopard) दोघा भावांनी गर्द काळोखात बॅटरीच्या उजेडाने पाठलाग करत दोन्ही कुत्र्यांचे प्राण वाचविले. निवी (ता. पाटण) या दुर्गम गावात काल रात्री नऊच्या सुमारास हा थरार घडला. मनोज व शैलेश गणपत माने अशी या धाडसी बंधूंची नावे आहेत. (Leopard Attacks Dogs In Dhebewadi Area bam92)
या वेळी क्षणाचाही विलंब न लावता हातात काठ्या व बॅटऱ्या घेऊन मनोज माने (वय ३०) व शैलेश माने (वय १८) या बंधूंनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला.
सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सिमेलगतच असलेल्या निवी परिसरात वन्य श्वापदांचा सतत उपद्रव जाणवतो. बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले आणि गव्यांसह डुकरांच्या कळपांचा उभ्या पिकातील धुडगूस ही तर तेथे नित्याचीच बाब आहे. काल रात्री नऊच्या सुमारास निवीतील गणपत महातू माने यांच्या घरातील लोक जेवत असतानाच अचानक बाहेर त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा आरडाओरडा कानावर आला. त्याच क्षणी जेवणाच्या तटावरून उठून सर्व जण बॅटऱ्या घेऊन बाहेर पळाले. त्या वेळी तीनपैकी दोन कुत्र्यांना फरफटत घेऊन निघालेला बिबट्या त्यांच्या दृष्टीस पडला.
Also Read: पती, सासू-सासऱ्यांचं ऐकून शेतकरी महिला बनली 100 गाईंची पालक
या वेळी क्षणाचाही विलंब न लावता हातात काठ्या व बॅटऱ्या घेऊन मनोज माने (वय ३०) व शैलेश माने (वय १८) या बंधूंनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. त्या वेळी एक कुत्रे बिबट्याच्या तोंडातून खाली पडले. साधारणपणे २० मीटर अंतरावर त्यांनी बिबट्याला गाठून दुसऱ्या कुत्र्याचीही सुटका केली. दोन्ही कुत्री प्रचंड भेदरलेली होती, त्यांच्या गळ्याला जखम झाल्याने रात्री प्रथोमोपचार करण्यात आले. सकाळी त्या परिसरात चिखलात पंजाचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आले.

आतापर्यंत डोंगरात व शिवारात बिबट्याचा उपद्रव जाणवत होता, आता तर तो थेट दारातच पोचला आहे. डोंगर कपारीतील जनतेने आणखी किती वर्षे हा उपद्रव सोसायचा.
मनोज माने, निवी
Leopard Attacks Dogs In Dhebewadi Area bam92
Esakal