टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमधील पुरुष गटात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का बसला. गोल्डन स्लॅमच्या दिशेने सुरु असलेली त्याची वाटचाल सेमीफायनलमध्ये संपुष्टात आली. सर्बियाच्या स्टार टेनिसपटूला जर्मनच्या अलेक्झांडर झ्वेरेवने याने 1-6, 6-3 आणि 6-1 अशा फरकाने पराभूत केले. या पराभवामुळे नोवाक जोकोविचचे ऑलिम्पिकच्या पहिल्या गोल्डसह ऐतिहासिक गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याच्या स्वप्न भंगले आहे.

Also Read: चक दे इंडिया! ‘जर-तर’च्या समीकरणात ‘राणी’चं साम्राज्य टिकणार?

जोकोविचने यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकली होती. कँलेंडर ईयरमधील प्रमुख चार ग्रँडस्लमसह ऑलिम्पिक गोल्ड जिंकून गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याची त्याला संधी होती. पण आता हे फक्त स्वप्न धूळीस मिळाले आहे. वर्षातील महत्वाच्या ग्रँडस्लॅम जिंकताना महत्त्वाच्या आणि मोठ्या लढतीत सुरुवातीला पिछाडीवर राहून त्याने बाजी मारल्याचे चित्र मागील काही सामन्यात पाहायला मिळाले होते. यावेळी त्याने पहिला सेट जिंकाला पण उर्वरित सेटमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले.

Also Read: Olympics : दुसऱ्या सेटमध्ये ‘कांटे की टक्कर’; सिंधूनं गाठली सेमीफायनल

मॅचच्या सुरुवातीला जोकोविचने दमदार खेळ दाखवला. अवघ्या 37 मिनिटात त्याने पहिला सेट 6-1 असा जिंकला. त्यानंतर अलेक्झांडर झ्वेरेवने दमदार कमबॅक केले. 45 मिनिटे चाललेला दुसरा सेट त्याने 6-3 जिंकत सामन्यात बरोबरी केली. अखेरच्या सेटमध्ये अलेक्झांडर झ्वेरेवने नंबर वन जोकोविचला कमबॅकची संधी दिली नाही. फायनलमध्ये अलेक्झांडर झ्वेरेवने समोर रशियन ऑलिम्पिक समितीच्या 12 व्या मानंकित खाचानोव याच्याशी होणार आहे. कांस्य पदकासाठी जोकोविच आणि स्पॅनिश खेळाडू कॅरेनो बुस्ता यांच्यात लढत रंगेल.

गोल्डन स्लॅमचा विक्रम स्टेफी ग्राफच्या नावे

टेनिस इतिहासात आतापर्यंत एकाही पुरुष खेळाडूने एक वर्षात चार ग्रँडस्लॅमसह ऑलिम्पिकचे गोल्ड मिळवण्याचा पराक्रम केलेला नाही. एकमेव महिला टेनिसपटूने गोल्डन स्लॅमची किमया केली आहे. 16 वर्षांच्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लम जिंकणाऱ्या स्टेफी ग्राफ या दिग्गज महिला टेनिसपटूने 1988 मध्ये अशक्यप्राय कामगिरी करुन दाखवली होती. 1988 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर याच वर्षी तिने सियोल ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कामगरी केली होती. गोल्डन स्लॅम पूर्ण करणारी ती एकमेव खेळाडू आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here