ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सातत्याने नावाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. याच ढंगात खेळत रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदकाचा रंग बदलत ती सोनेरी कामगिरी करेल, अशी आशा भारतातील तमाम क्रीडा चाहत्यांना आहे. क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या यामागुचीला पराभूत करत सिंधूने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिकमधील आणखी एक विजय सिंधूचे पदक पक्के करेल. एवढेच नाही तर तिच्या नावे अनेक विक्रमाची नोंद होईल. भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत केवळ अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याच्याशिवाय कोणालाही सुवर्ण कामगिरी करता आलेली नाही. सिंधू पुन्हा एकदा भारताला सोनेरी क्षणाची अनुभूती देईल, असे वाटते.
Also Read: चक दे इंडिया! ‘जर-तर’च्या समीकरणात ‘राणी’चं साम्राज्य टिकणार?
2016 ची चंदेरी कामगिरी यंदा सोनेरी करायची असेल तर सिंधूला तगडी फाइट द्यावी लागले. सेमीफायनलपासूनच तिच्या या चॅलेंजला सुरुवात होईल. सेमीफायनलमध्ये सिंधूसमोर चायनीज तैपेईच्या ताइ त्झू यिंगचे (Tai Tzu Ying) आव्हान असेल. सध्याच्या घडीला ती महिला टेनिस जगतात नंबर रँकिंगला आहे. सेमीफायनलमध्ये सिंधूने ही भिंत पार केली तर तिच्यासमोर फायनलमध्ये चेन युफाई (Chen Yufei) किंवा बिंग जिआवो (Bing Jiao) या दोघीपैकी एकीचे आव्हान असेल.

ताइ त्झू यिंग Tai Tzu Ying (चायनीज तैपेई)
जागतिक रँकिंग : 1
सिंधूसोबत सेमीफायनलमध्ये भिडणार
पीव्ही सिंधू विरुद्ध रेकॉर्ड: 13-5
ऑलिम्पिकमधील कामगिरी
दोनवेळा तिने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. पण दोन्ही वेळा राउंड ऑफ 16 मध्येच तिला गाशा गुंडाळावा लागला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनेच तिला बाहेरचा रस्ता दाखवला होता.
2020 पासून आतापर्यंतचा प्रवास
25 विजय, 4 पराभव
विजेतेपद: ऑल इंग्लंड ओपन 2020, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2020
उपविजेतेपद: मलेशिया मास्टर्स 2020, थायलंड ओपन 2021 (दो वेळा)
Also Read: IND vs SL: द्रविड गुरूजी लंका दौऱ्यात ‘या’ क्रिकेटपटूवर नाराज

चेन युफेई Chen Yufei (चीन)
जागतिक रँकिंग : 2
फायनलमध्ये होऊ शकते सिंधूची टक्कर
सिंधू विरुद्ध रेकॉर्ड 4-6
ऑलिम्पिक कामगिरी
पहिल्यांदाच ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालीये.
2020 पासून आतापर्यंतचा प्रवास
12 विजय 2 पराभव
विजेतेपद: मलेशिया मास्टर्स 2020
उपविजेतेपद: ऑल इंग्लंड ओपन 2020

ही बिंगझाओ (चीन)
जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर
सिंधूसोबत फायनलमध्ये लढू शकते.
सिंधू विरुद्धचे रेकॉर्ड 9-6
ऑलिम्पिकमधील कामगिरी
पहिल्यांदा ती ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहे.
2020 पासून आतापर्यंतची कामगिरी
11 विजय, 3 पराभव
सेमीफायनल: मलेशिया मास्टर्स 2020, इंडोनेशिया मास्टर्स 2020
Esakal