अभिनेत्री कियारा अडवाणीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
कियाराने इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या म्हणण्यानुसार स्वत:चं नाव बदललं.कियाराचं खरं नाव ‘आलिया’ असं आहे. सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. बॉलिवूडमध्ये आधीच आलिया भट्ट ही अभिनेत्री असल्याने सलमानने कियाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. आधार कार्ड आणि पासपोर्टवरील नाव मात्र आलिया अडवाणी असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं.