नागपूर : देशाच्या इतिहासात नागपूरचे नेहमीच महत्वाचे स्थान राहिले आहे. येथील संस्कृती, भौगोलिक प्रदेश, खाद्यसंस्कृती, भरपूर वनसंपदा, खनिजसंपत्ती याठिकाणी आहे. तसेच नागपूर हाच देशाचा केंद्रबिंदू आहे. तुम्हाला जर देशाच्या केंद्रबिंदूला (India center point nagpur) भेट द्यायची असेल तर कोणत्या स्थळांना भेट द्यायची याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (best places to visit in nagpur)

झिरो माईल हे भारताचा केंद्रबिंदू आहे. ब्रिटिशांनी देशातील शहरांमधील अंतर मोजले होते. शहराचे अंतर मोजण्यासाठी ज्या ठिकाणी स्तंभ रोवला. देशाचा भौगोलिक मध्यबिंदू असल्याने त्याला झिरो माईल असे नाव देण्यात आले.

नागपुरातील दीक्षाभूमी स्तूप हा बौद्ध धर्माचा प्रसिद्ध आणि पवित्र स्मारक असून नागपुरातील पर्यटन केंद्रापैकी एक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. देशभरातून अनेक बौद्ध अनुयायी याठिकाणी भेट देतात.

ड्रॅगन पॅलेस हे नागपुरातील प्रसिद्ध स्थळ असून नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात वसलेले आहे. येथील वातावरण अंत्यत शांतपूर्ण आणि अल्हाददायक असतं. तसेच नागपूरवरून जवळपास ४५ मिनिटाच्या अंतरावर हे स्थळ आहे.

फुटाला तलाव हा शहराच्या वेशीवर आहे. याठिकाणी तरुणाईची गर्दी असते. तसेच प्रेमीयुगुलांसाठी देखील हे स्थळ प्रसिद्ध आहे. फुटाळा तलावाच्या जवळच तेलंगखेडी तलाव देखील आहे.

गोरेवाडा हे आंतरराष्ट्रीय प्राणीउद्यान असून याचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी वाघासह अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.

स्वामीनारायण मंदिर हे रिंग रोडवर बनलेले आहे. हे मंदीर खूप मोठे असून कोरीव काम झालेले आहे. नागपुरात आल्यानंतर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर सायंकाळी चार वाजता तुम्ही इथे भेट देऊ शकता. या मंदिरात खूप गर्दी असते.

सिताबर्डी किल्ला हा सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आकर्षण आहे. याठिकाणी आता भारतीय सेनेचे पथक असते. हे स्थळ रेल्वे स्थानकाजवळून अगदी जवळ आहे.
Esakal