रेठरे बुद्रुक (सातारा) : पूरग्रस्तांच्या (Satara Flood) मदतीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. लोकांनी खचू न जाता धीराने संकटाला तोंड द्यावे. रेठरे बुद्रुकच्या मुख्य चौकात हाय मास्ट पथदिवा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव द्यावा, असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी कृष्णाकाठी पूरग्रस्त व नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात केले. आमदार चव्हाण यांनी कोडोली, दुशेरे, शेरे, खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, तसेच मालखेड आदी ठिकाणी जाऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. (Satara Flood MLA Prithviraj Chavan Visit Kodoli Dushere Shere Rethare Budruk Malkhed Villages bam92)
पूरग्रस्तांच्या (Satara Flood) मदतीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. लोकांनी खचू न जाता धीराने संकटाला तोंड द्यावे.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, शंकरराव खबाले, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, बाळासाहेब जगताप, वैभव थोरात, सूरज जगताप, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, कृष्णत चव्हाण- पाटील, शिवराज मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, सनी मोहिते आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी कोडोली गिरण पाणंद रस्त्यावरील निचरा प्रणाली कामाची पाहणी करताना कोडोली व दुशेरे येथील ग्रामस्थांनी समन्वयातून हा प्रश्न निकाली काढावा, असे सुचवले. दुशेरे, शेरे व खुबीच्या नुकसानीचा आढावा घेतला.
Also Read: ‘पंचनाम्यात एकही बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या’
रेठरे बुद्रुकच्या आरोग्य केंद्रात भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता कदम यांनी छत पावसाळ्यात गळत असल्याचे सांगितले. आमदार चव्हाण यांनी याकामी साडेपाच लाखांचा निधी मंजूर असून, आमदार निधीतून साहित्यासाठी निधी दिला जाईल, असेही सांगितले. श्री. उंडाळकर यांनी जिल्हा परिषदेतून याकामी निधी मिळणार असल्याचे सांगितले. रेठरे खुर्द येथे सरपंच मधुकर एटांबे, राम मोहिते, तर मालखेड येथे सरपंच इंद्रजित ठोंबरे, देवदास माने यांनी नुकसानीची माहिती दिली.
Also Read: ‘वीज वितरण’ची 13 कोटींची हानी; अतिवृष्टीत 11 हजार पडले खांब!

रेशनिंग दुकानदारांनी गाठले घर?
आमदार चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत खुबी व रेठरे बुद्रुक येथील पूरग्रस्तांना आलेल्या धान्याचे वाटप करण्याचे नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते; परंतु त्यांच्या प्रयत्नांना खुबी व रेठरे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला. दुकाने बंद करून त्यांनी घर गाठले. या गंभीर घटनेची परिसरात चर्चा सुरू होती.
Satara Flood MLA Prithviraj Chavan Visit Kodoli Dushere Shere Rethare Budruk Malkhed Villages bam92
Esakal