मुंबई – पॉर्नोग्राफीच्या (pornography case) केसमध्ये बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) सध्या अटकेत आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सततच्या वेगवेगळ्या आरोपांमुळे त्याच्यावरील दबाव वाढताना दिसत आहे. मात्र यासगळ्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पालाही मोठ्या प्रमाणात मनस्ताप झाल्याचे समोर आले आहे. तिनं याविषयी तक्रारही केली होती. यापूर्वी दिग्दर्शक हंसल मेहता (hansal mehata) तिच्या बाजुनं बोलले होते. केवळ पार्टीसाठी एकत्र येणाऱ्या बॉलीवूडनं आता शिल्पाला आधार देण्याची गरज आहे. आता त्यात आणखी एका अभिनेत्रीनं शिल्पाला पाठींबा दिला आहे. (actress richa chadha backs shilpa shetty in raj kundra pornography blaming women for mistakes of men yst88)

अभिनेत्री रिचा चढ्ढा (richa chaddha) ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री. ती तिच्या परखड वक्तव्यासाठी लोकप्रिय आहे. भवतालच्या परिस्थितीवर सडेतोडपणे भाष्य करणं हा तिचा स्वभाव आहे. त्यासाठी ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. मात्र त्याचा काही एक परिणाम रिचाच्या वागण्यावर झालेला नाही. तिनं खुलेपणानं शिल्पाला पाठींबा दिला आहे. तिचं ते वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. शिल्पावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत याचे कारण म्हणजे ती राजच्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे बँक अकाउंटही सील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पाचीही चौकशी पोलिसांनी केली आहे.
Also Read: ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवणाऱ्या मीराबाई चानुवर ‘बायोपिक’
Also Read: राज कुंद्राच्या दोन अॅपमधून मिळाले 51 पॉर्न व्हिडिओ
रिचानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर पुरुषाकडून चूक झाली तर त्याचा दोष स्त्रीला दिला जातो. हा प्रकार बंद होण्याची गरज आहे. हंसल मेहता यांनी शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ जी पोस्ट लिहिली होती त्याला रिचानं आपलं समर्थन दिलं आहे. जेव्हा एखाद्या पुरुषाच्या हातून एखादी चूक होते तेव्हा त्याला दोषी ठरविण्याऐवजी त्याच्या आयुष्यात असणाऱ्या महिलेला दिला जातो. लोकं तिलाच जबाबदार ठरवतात. शिल्पानं आता अशा लोकांविरोधात तक्रार केली आहे. त्यात तिचं कौतूक करायला हवं.
रिचा पूर्वी दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शिल्पाच्या बाजुनं आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी लिहिलं होतं, सध्या एक गप्प बसण्याचा प्रकार बॉलीवूडमध्ये दिसून येतो. चांगल्या वेळेत हेच लोकं पार्टीसाठी एकत्र येतात. खरं जे काही असेल मात्र त्याची झळ आणखी कुणाला बसत आहे याचा विचारही करणं गरजेचे आहे.
Esakal