‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

रणजीत घरी परतणार आहे. मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे. पण आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत.
पुन्हा एकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे.
या डेटवर राजा रानी कुल लूकमध्ये दिसणार आहेत.
खास डेटसाठीची संजूची जय्यत तयारीदेखील आहे. संजीवनी बुलेट चालवणार आहे. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार, हे सोमवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
राजा रानीची गं जोडी मालिकेचा सोमवार विशेष भाग संध्या ७.०० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here