चाळीसगाव : पाटणादेवी (ता. चाळीसगाव) जंगलात ( Patnadevi Forest Areya) घनदाट झाडीतून चंदनचोरांना (Sandalwood thieves) पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर (Forest Department squads) रात्रीच्या सुमारास एका चंदनचोराने कुऱ्हाडीने हल्ला (Attack) केला. मात्र, वनरक्षकाच्या दिशेने फेकलेली कुऱ्हाड झाडाच्या फांदीत अडकल्याने अनर्थ टळला. या दरम्यान, अंधाराचा फायदा घेत चंदनचोर त्यांच्याजवळील साहित्य सोडून फरारी झाले. या घटनेमुळे चंदनतस्करीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(chalisgaon patnadevi forest areya sandalwood thieves attack by forest department squads)

Also Read: आता मतदारकार्ड मिळणार एका क्लिकवर

या कारवाईत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, असे सर्पतज्ज्ञ तथा मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी ‘सकाळ’ला आपबिती कथन केली. श्री. ठोंबरे यांनी सांगितले, की शनिवारी (ता. ३१ जुलै) पाटणादेवीच्या जंगलात काही चंदन तस्कर शिरल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानुसार तातडीने या संदर्भात औरंगाबाद येथील वन्यजीवचे विभागीय वनाधिकारी विजय सातपुते व कन्नड येथील सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण यांना ही माहिती दिली. श्री. सातपुते हे कामानिमित्त बीड दौऱ्यावर होते. त्यामुळे आशा चव्हाण यांनी नागदचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले आणि राजेश ठोंबरे यांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. औरंगाबाद येथून श्रीमती चव्हाण, नागद येथून ढोले व त्यांचे निवडक कर्मचारी, कन्नड येथून वनपाल श्री. मोरे व त्यांचे काही सहकारी, तसेच चाळीसगाव येथून राजेश ठोंबरे, वनरक्षक अजय महिरे, राम डुकरे आणि पाटणादेवी जंगलाची खडा न खडा माहिती असलेले वनमजूर कैलास चव्हाण असे सर्व रात्री दीडच्या सुमारास ठरलेल्या जागी पोचले.

चंदनचोराने फेकली कुऱ्हाड
जवळपास दीड तासाची पायपीट करीत दाट झाडी असलेल्या जंगल भागात सर्व पोचले. तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. दोन टीम करून कोणी कुठे थांबायचे, चंदन तस्कर दिसल्यावर काय इशारा करायचा, त्यांच्याकडे असणाऱ्या घातक हत्यारापासून स्वतःला कसे वाचवायचे यांचे नियोजन करीत असतानाच एका घळीतून चार जण अचानक समोर आले. त्यातील एकाने बॅटरी लावून समोर कोण आहे, हे बघण्याचा प्रयत्न केला. वनरक्षकाला वाटले, की आपल्याच माणसाने बॅटरी लावली. तेवढ्यात उजेडात श्रीमती चव्हाण यांना खात्री पटली, की हेच चंदन तस्कर आहेत. त्या मोठ्याने ओरडल्या ‘पकडा त्यांना’, असे म्हणताच, सर्व तिकडे धावले. अंधारात एकच गदारोळ झाल्यानंतर चंदन तस्कर त्यांच्याकडील पिशव्या टाकून दाट जंगलाच्या दिशेने धावत सुटले.

Also Read: ‘जळगावकर’ म्हणायचीही आता लाज वाटते..!

कुऱ्हाड झाडाच्या फांदीत अडकली

एका चंदन तस्कराने त्याच्या हातातील धारदार कुऱ्हाड वनरक्षकाला मारून फेकली. सुदैवाने ती झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. जंगलात शोधाशोध करताना चंदनचोरांच्या पिशव्या मिळाल्या. एका पिशवीत करवती, कुऱ्हाडी, टॉमी व गलोल आढळले. तर दोन पिशव्यांमध्ये मौल्यवान चंदनाचा गाभा भरलेला होता. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चंदनचोर पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा विश्‍वास वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here