अर्धापूर (जि.नांदेड) : कमी खर्च, खते औषधांचा वापर कमी व कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रुट थायलंड (Thailand), मलेशिया, इस्त्रायल आदी देशात भरपूर प्रमाणात घेण्यात येते. पण याच ड्रॅगन फ्रुटची लागवड (Dragon Fruit In Nanded) करून यशस्वी उत्पादन एका सेवानिवृत्त नेत्र तज्ज्ञ असलेल्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने  करून दाखवले आहे. रूग्णांची नाडी तपासत बाजारपेठ व जमिनीची नाडी योग्य ओळखून डाॅ. उत्तमराव इंगळे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील (Nanded) ड्रॅगन फ्रुट लागवडीचा पहिला प्रयोग यशस्वी केला असून उत्पादन सुरू झाले आहे. त्यांची ड्रॅगनची शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी येत आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर बहुतांश अधिकारी, कर्मचारी आरामदायी जीवन जगण्याकडे कल असतो. शेतकरी कुटुंब व स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा लाभलेल्या डाॅ उत्तमराव इंगळे यांनी आरोग्य विभागात सेवा  केल्यानंतर वैद्यकीय सेवा देत आपल्या लहान येथील शेत-शिवारात नुसतेच रमले नाही तर शेतीत नव-नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करित आहेत. त्यांनी पारंपरिक पिकांसोबत ड्रॅगन फ्रुटची (Ardhapur) लागवड केली आहे.

अर्धापूर तालुक्यात शेतात घेतलेले ड्रॅगन फ्रूटचे पिक.

Also Read: पंचायत समिती सदस्याचा अवेळी मृत्यू, अनेकांच्या घराला दिलाय आधार

लहान येथील इंगळे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. या कुटुंबात सुमारे १८ एकर शेती आहे. वैद्यकीय सेवेत असताना डाॅ इंगळे यांनी शेतीकडे दुर्लक्ष केला नाही. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीकडे विशेष लक्ष देऊन जिल्ह्यात पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रुटची दोन एकरवर लागवड केली. शेतीची योग्य प्रकारे मशागत करून दोन सरित आठ बाय दहा अंतर ठेवून वेलवर्गी  ड्रॅगनची लागवड केली. वेलींना अधार देण्यासाठी सिमेंटचे खांब उभे करण्यात आले. दोन एकरमध्ये १२०० सिमेंट पोल लागले आहेत. प्रतिपोल ३५० रूपये याप्रमाणे एवढी गुंतवणूक करावी लागली आहे. एका पोलला चार वेल या प्रमाणे ४ हजार ८०० कलम लावण्यात आली आहेत. एका कलमेला वीस रूपये खर्च आला आहे. या कलमा पुणे जिल्ह्यातून आणल्या आहेत. याची लागवड जुलै २०१९ मध्ये करण्यात आली आहे. वेलींना पाणी समतोल मिळावे, यासाठी ठिबक सिंचन बसविण्यात आले. तसेच मिश्र खते, शेणखत देण्यात आली आहे. यात फळाची लावगवड साध्या शेतजमिनीत ही करता येत. उन्हाळ्यात उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साड्या वेलीवर टाकाव्या लागतात.

Also Read: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-रुपी सेवेचा प्रारंभ

तापमान ४० अंशाच्यावर गेल्यास बाग करपण्याची शक्यता असते. या फ्रुटची लागवड दोन वर्षांपूर्वी केल्यानंतर यंदाच्या हंगामात काढणीसाठी फळे आली आहेत. या फळधारणा सुरू झाल्यावर वर्षातून दोन वेळा काढणी करता येते. एकदा गुंतवणूक केल्यानंतर वीस वर्षे फळे येतात. दोन एकरासाठी सुमारे दोन लाखांची  गुंतवणूक करावी लागली आहे. हे फळ औषधी गुणधर्म असल्यामुळे बाजारपेठा चांगली मागणी आहे. राज्यात  पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी बाजारपेठ असून  मागणी प्रमाणे प्रतिकिलो १०० ते १५० भाव मिळतो. मराठवाड्यात औरंगाबाद नंतर नांदेडमध्ये अर्धापूरात डाॅ इंगळे यांनी लागवड केली आहे. एका वेलीला वर्षभरात १५ ते २० किलो फळे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात पाणी देणे बंद करावे लागते. तसेच किड, रोगाची लागण कमी असते. खतेही कमी लागतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here